

Ramesh Mhatre surrender : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे अखरे रविवारी पोलिसांसमोर शरण आले ओत. कल्याणच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी रद्द केला. तसेच त्यांना रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा कडक आदेश दिला होता.
प्रभाराधिकारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखद यांच्या खंडपीठाने कल्याण न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (मॅजिस्ट्रेट कोर्ट) रमेश म्हात्रे यांना मंजूर केला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढताना हायकोर्टाने म्हटले की, "मॅजिस्ट्रेट कोर्टाने आरोपीच्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले." आरोपीची १७ गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता झाली असली, तरीही त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर व अमानुष गुन्ह्यांसह एकूण १८ गुन्हे दाखल होते, या वस्तुस्थितीचा न्यायालयाने विचार करायला हवा होता."
दरम्यान, या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून डॉक्टरांनी २० जुलै (सोमवार) रोजी पुकारलेल्या नियोजित संपावर पुनर्विचार करावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाने केले आहे. डॉक्टरांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने (IMA) या घटनेचा निषेध करत सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली होती. आता मुख्य आरोपी तुरुंगात गेल्यामुळे आणि न्यायालयाने आवाहन केल्यामुळे डॉक्टरांची संघटना या संपाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.