Ganeshotsav: गणपतीसाठी कोकणला निघताय? प्रवास सुरू करण्यापूर्वी ‘हे’ ॲप डाउनलोड करा; अपघाताचा धोका टाळण्यास होईल मदत

गणेशभक्त, चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व अपघातमुक्त व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने विशेष मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
Mumbai Goa highway
Mumbai Goa highwayFile Photo
Published on
Updated on

Ganeshotsav 2026 Mumbai Goa highway travel

रायगड : गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा तसेच कोकणाकडे जाणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत आहे. गणेशभक्त, चाकरमानी आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित व अपघातमुक्त व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने ‘Black Spot RTO Panvel’ हे विशेष मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या अॅपचा प्रवासापूर्वी वापर करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

या अॅपच्या माध्यमातून महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’धोकादायक वळणे आणि संभाव्य धोकादायक क्षेत्रांची माहिती वाहनचालकांना आधीच मिळणार आहे. संबंधित ठिकाण जवळ येताच चालकाला अलर्ट मिळत असल्याने वाहनाचा वेग कमी करून आवश्यक ती खबरदारी घेणे शक्य होणार आहे.

Mumbai Goa highway
Mumbai Goa Highway traffic: गणेशोत्सवात महामार्ग कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते?, पेण ते पोलादपूरमधील रस्त्यांची यादी

‘Black Spot RTO Panvel’ हे अॅप Android (Google Play Store) तसेच iOS (Apple App Store) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे. प्रवासी व वाहनचालकांनी प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवावा, धोकादायक ओव्हरटेकिंग टाळावे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट तर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा अनिवार्यपणे वापर करावा. मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये. तसेच थकवा किंवा झोप येत असल्यास सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवून पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरच पुढील प्रवास करावा, असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरक्षित वाहन चालवा आणि आपल्या कुटुंबासह सुरक्षित घरी पोहोचा,’ असा संदेश प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Mumbai Goa highway
Mumbai Goa Highway: गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; राज्य सरकारचा निर्णय
logo
Pudhari News
pudhari.news