Thane Land Allocation : कल्याण बाजार समितीचा ५० गुंठ्यांचा भूखंड वादात

प्रशासकांच्या निर्णयावर आमदार किसन कथोरेंचे आक्षेप; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
Thane Land Allocation
Thane Land Allocationpudhari photo
Published on: 
Updated on: 

सापाड : योगेश गोडे

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सापाड येथील ५० गुंठे भूखंडाच्या वाटपावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक डॉ. किशोर मांडे यांनी घेतलेल्या भूखंड वाटपाच्या निर्णयावर आमदार किसन कथोरे यांनी आक्षेप घेतला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे बाजार समितीतील भूखंड वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

बाजार समितीच्या सर्व्हे क्रमांक २८२ आणि २८४ मधील भूखंड वाटपाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यापूर्वी २००९ आणि २०१२ मध्येही बाजार समितीच्या जागेवर दुकाने उभारण्यासाठी भूखंड वाटपाचे निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने करण्यात आलेल्या वाटपाची प्रक्रिया आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Thane Land Allocation
Thane Traffic Jam : नियोजनशून्य प्रकल्पांमुळे ठाणे बनले वाहतूककोंडीचे केंद्र

विशेष म्हणजे, २९ जून २०२५ रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून २०२५ रोजी संबंधित भूखंड वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर इतक्या तातडीने हा निर्णय घेण्याची गरज काय होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या भूखंडावर सुमारे १३० दुकाने उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित भूखंड दहा वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी २० लाख रुपये अनामत रक्कम आणि वार्षिक अडीच लाख रुपये भाडे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. बाजार समितीच्या मालमत्तेचा वापर आणि त्यातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता या निर्णयाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे आमदार कथोरे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातील निर्णयप्रक्रिया, कागदपत्रांची उपलब्धता, भूखंड वाटपाचे निकष आणि आर्थिक व्यवहार यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच पणन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालीन प्रशासक डॉ. किशोर मांडे यांची या प्रकरणातील भूमिका आणि निर्णयामागील कारणेही महत्त्वाची ठरणार आहेत. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Thane Land Allocation
Mumbai CCTV Security : मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणांचे ऑडिट होणार?

बाजार समितीच्या मालमत्तेचे वाटप पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. या प्रकरणात काही गैरप्रकार झाला असल्यास तो उघडकीस आला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आमदार किसन कथोरे यांनी मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.