Thane News : आधारवाडी तुरूंगात पोलिसांवर मलमूत्र मिश्रित पाणी फेकण्याचा प्रयत्न

पिसाळलेल्या कैद्याचा घृणास्पद प्रकार; खडकपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
Kalyan Adharwadi jail
आधारवाडी तुरूंगात पोलिसांवर मलमूत्र मिश्रित पाणी फेकण्याचा प्रयत्नpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरूंगात मंगळवारी दुपारी पिसाळलेल्या एका कैद्याकडून घृणास्पद प्रकार घडला. या कैद्याने अचानक धिंगाणा घालून तुरूंगातील पोलिसांवर मलमूत्र मिश्रित असलेल्या बादलीतील पाणी अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. शिवाय या कैद्याने तुरूंगाधिकाऱ्यांच्या केबिनची काच फोडून राग व्यक्त केला.

या घटनेनंतर तुरूंगात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी न्यायबंदी रविंद्र धनाजी भोसले याच्या विरूध्द खडकपाडा पोलिसांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि तुरूंगातील शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपाखाली तुरूंग प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Kalyan Adharwadi jail
Indian Railway : बनावट तिकीटावर प्रवास करत असाल तर सावधान ! मध्य रेल्वेकडून नऊ दलालांना अटक

आरोपी रविंद्र भोसले हा सद्या आधारवाडी तुरूंगातील सर्कल क्रमांक 8 मध्ये न्यायबंदी आहे. भोसले याच्या विरोधात तुरूंगातील हवालदार भगवान बागूल यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हवालदार भगवान बागूल हे न्यायबंदी सर्कल क्रमांक 8 परिसरात गस्ती घालत होते. तेथील कैदी रविंद्र भोसले याला आंघोळ आणि शौचालयासाठी कोठडीतून बाहेर काढले. त्याला आंघोळीसाठी बादली देण्यात आली.

Kalyan Adharwadi jail
Satara crime: व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

न्यायबंदी भोसले हा प्रात:र्विधीनंतर आंघोळ करील असे गस्तीवरील हवालदार भगवान बागूल यांना वाटले. मात्र भोसले याने मानवी विष्ठा आणि मलमूत्र टाकलेल्याच्या पाण्याची बदली घेऊन तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. हे पाहून गस्तीवरील पोलिसांनी त्याला रोखले. त्यावेळी त्याने बादलीतील मलमूत्र असलेले घाण पाणी हवालदार भगवान बागूल आणि गस्तीवरील इतर पोलिसांच्या अंगावर फेकून देण्याची धमकी दिली.

तासाभराच्या गोंधळानंतर कैदी जेरबंद

मलमूत्राच्या पाण्याने भरलेली बादली कोणत्याही क्षणी फेकून कारागृहात घाण करील, या भितीने पोलिस या कैद्याला आवरण्याचा प्रयत्न करत होते. तरीही त्याने तुरूंगाधिकारी अभिजीत कोळी यांच्या दालनाच्या दिशेने धाव घेऊन तेथील केबिनच्या काचा हाताच्या कोपराने फोडल्या. मला पकडल्यास तुमच्या अंगावर मानवी मलमूत्र असलेल्या पाण्याची बादली फेकून मारेन, अशी त्याने धमकी दिली. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. अखेर मोठ्या कौशल्याने गस्तीवरील पोलिसांनी कैदी रविंद्र भोसलेला पकडून त्याच्याकडील बादली काढून घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news