

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात झाला असून यामध्ये डंपर पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळला आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
कल्याणच्या गांधारी पुलावर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला. जखमीला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून बापगाववरून निलेश वानखेडे हा रिक्षचालक आपल्या आईला कल्याणला रिक्षाने घेऊन जात होता. यावेळी कल्याण पश्चिम येथील गांधारी पुलावर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली.यात रिक्षा चालकाची आई मंगल वानखेडे हिचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक निलेश वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला आहे. घटनास्थळी कल्याण खडकपाडा पोलीस दाखल झाले आहेत.