Thane TDR Controversy: ठाणे महापालिका टीडीआर घोटाळ्यामागे आहे कोण? आमदार जितेंद्र आव्हाड यांचे महापालिकेवर गंभीर आरोप

यामध्ये वन खात्याची भुमीका देखील संशयास्पद असल्याचे आव्हान आव्हाड यांनी म्हंटले आहे.
Thane TDR Controversy
Thane TDR ControversyPudhari
Published on
Updated on

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानपाडा येथील भूखंडाच्या 2800 कोटींच्या टीडीआरवर तुळशीपत्र ठेऊन कंपनीशी तडजोड करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनावर आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. आव्हाड यांनी समाज माध्यमांवर ट्विट करत ठाणे महापालिका मॅनेज, आहे कोण ह्याच्या मागे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामध्ये वन खात्याची भुमीका देखील संशयास्पद असल्याचे आव्हान आव्हाड यांनी म्हंटले आहे.

Thane TDR Controversy
Farmer Compensation Delay: नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना निधी वाटपात संथपणा

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या चितळसर-मानपाडा येथील सुमारे 193 एकर जमिनीवर डी. दाह्यामाई अँड कंपनी यांनी दावा केला होता. यावरून राज्य शासना सोबत त्यांचा लढा सुरु आहे. या ठिकाणी ठाणे महापालिकेने 100 एकर जमिनिवर आरक्षण टाकले होते. मात्र त्याबदल्यात कंपनीने पालिकेकडून 2800 कोटींच्या टीडीआरची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने देखील कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता.

ठाणे महापालिकेला याविरोधात ठाणे न्यायालयात गेल्यानंतर या प्रकरणाला स्थगिती मिळाली होती. त्यानंतर मात्र कंपनीकडून पालिकेच्या नोटिसीला उत्तर येण्याच्या आधीच महापालिकेने संबंधित कंपनी सोबत तडजोड केल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले आहे.

काही अटी शर्थीच्या आधारावर ही तडजोड करण्यात आली असून यासंदर्भात ठाणे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे. पालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात टीडीआर संदर्भात टाकण्यात आलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली असून यामुळे 2800 कोटींच्या टीडीआरवर ठाणे महापालिकेला पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

Thane TDR Controversy
Zero Waste Campaign:रेवदंडा मासे बाजारात प्लास्टिक कॅरीबॅगला फाटा; अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम हाती

वन विभागदेखील याचिका टाकणार

या संपूर्ण घडामोडीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात ठाणे महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी समाज माध्यमांवर ट्विट करत ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

या प्रकरणात ठाणे महापालिका मॅनेज झाली आहे. यामध्ये नक्की आहे कोण ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात वन विभागाने देखील याचिका टाकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्यांच्याकडूनही कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत. आमदार आव्हाड यांनी वनखात्याच्या कारभारावर देखील संशय व्यक्त केला असून हा टीडीआर घोटाळा पालिकेच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news