गोवा-मुंबई महामार्गावर १ कोटी १८ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

गोवा-मुंबई महामार्गावर १ कोटी १८ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात विक्री करण्यास बंदी असलेला लाखोंचा बेकायदेशीर विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने गोवा मुंबई महामार्गावर कल्हेगाव, ता. पनवेल येथे पकडला. या मार्गावरून जाणाऱ्या एका कंटेनरची पथकाने तपासणी केली असता त्यात मद्याचे तब्बल १ हजार ५५७ बॉक्स आढळून आले.

या सर्व मुद्देमालाची किंमत १ कोटी १८ लाख ९४ हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी, कंटेनर चालक राजशेखर सोमशेखर परगी (४१, हुबळी, कर्नाटक) आणि खजाहुसेन दवलसाब हितलमनी (५८, हुबळी, कर्नाटक या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news