कसारा, ठाणे
परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Pudhari News Network

HSC Board Exam : बारावीची परीक्षा! तणावाचे व्यवस्थापन केले एवरग्रीन गुलाबांनी

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
Published on

कसारा : शाम धुमाळ

जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खर्डी (दळखन) येथे मंगळवार (दि.11) रोजी इयत्ता १२ वी च्या परीक्षेस सुरुवात झाली. परीक्षा केंद्रावर 417 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत.

कसारा, ठाणे
टेेंशन फ्री होत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी Pudhari News Network

बोर्ड परीक्षा तणावमुक्त व भयमुक्त निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी शिवकुमार जाधव (पोलिस उपनिरीक्षक खर्डी) अमेय आठवले, अनिल घोडविंदे, प्रशांत घोडविंदे, नरेश जाधव, अजय सिंग, भगवान मोकाशी, कायनात सय्यद, (उपसरपंच, दळखण) प्रा. कैलास कळकटे यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा देऊन विधायक दृष्टिकोनातून पेपरला सामोरे जा व यशाला गवसणी घाला असा अनमोल संदेश दिला. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आलेले टेंशन गायब झाल्याचे पहावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news