Kalyan fraud case : हॉटेलच्या भागीदारीत दोघांकडून दगा

1.50 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Fraud Case |
हॉटेलच्या भागीदारीत दोघांकडून दगाFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-शिळ क्रॉस काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळे येथील हॉटेल कुशाला ग्रीनमधील भागीदारी हिस्सा विक्री प्रकरणात दोन हॉटेल व्यावसायिकांनी एका हॉटेल व्यावसायिकाची 50 लाखांची फसवणूक केली आहे. या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल व्यावसायिक अरविंद आनंद शेट्टी (52) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक नंदकिशोर रुद्राया राय (57, रा. एमआयडीसी, डोंबिवली) आणि भास्कर पुजारी (मयत, रा. डोंबिवली) यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादी अरविंद शेट्टी हे मिरा-भाईंदर परिसरातील राहतात. नोव्हेंबर 2018 मध्ये हा सगळा फसवणकीचा प्रकार काटई जवळच्या कोळे गावात असलेल्या हॉटेल कुशाला ग्रीनमध्ये घडला आहे.

Fraud Case |
Breast cancer : लठ्ठपणामुळे महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका

यातील फिर्यादी हॉटेल व्यावसायिक अरविंद शेट्टी यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सन 2018 मध्ये भास्कर पुजारी (मयत) यांनी हॉटेल कुशाला ग्रीनमधील 50 टक्के हिश्श्यातील पाच टक्के हिस्सा 50 लाख रूपये किमतीमध्ये आपणास विक्री केला. हा व्यवहार माहिती असताना देखील या प्रकरणातील गुन्हा दाखल हॉटेल व्यावसायिक नंदकिशोर राय यांनी भास्कर पुजारी यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन सन 2005 च्या काळातील काही बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांवर भास्कर पूजारी यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या.

अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे हॉटेल कुशाला ग्रीनमधील भास्कर पुजारी यांचा उर्वरित हिस्सा आणि यापूर्वी भास्कर पूजारी यांनी अरविंद शेट्टी यांना विक्री केलेला भागीदारी हिस्सा सन 2019 मध्ये श्रीकांत देशपांडे, प्रितम घैसास, अरूण रोट्री यांना विक्री केला. विक्री व्यवहाराला अधिकृतता येण्यासाठी या विक्री व्यवहाराचे कागदपत्रे कल्याणमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात 5 मार्च 2019 रोजी दस्त नोंदणीकृत केल्याचे अरविंद शेट्टी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

Fraud Case |
BMC environment department : पर्यावरण विभागात अभियंत्यांच्या 42 जागा रिक्त

चालू बाजारभावाप्रमाणे दीड कोटींची फसवणूक

हॉटेल व्यावसायिक नंदकिशोर राय यांना भास्कर पुजारी यांनी हॉटेल कुशाला ग्रीनमधील त्यांचा पाच टक्के हिस्सा मिरा-भाईंदरमध्ये राहणारे हॉटेल व्यावसायिक अरविंद शेट्टी यांना विक्री केला आहे. हा व्यवहार दस्त नोंदणीकृत करून पूर्ण करण्यात आला आहे. हे माहिती असताना देखील हॉटेल व्यावसायिक शेट्टी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विक्री व्यवहाराची बाब इतरांपासून लपवून ठेऊन आरोपींनी तक्रारदार अरविंद शेट्टी यांच्या हिश्श्यातील यापुर्वी विक्री केलेल्या व्यवहाराप्रमाणे पाच टक्के हिस्सा आजच्या बाजार भावाप्रमाणे विक्री करून हॉटेल व्यावसायिक अरविंद शेट्टी यांची एक कोटी 50 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक कानडे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news