Thane District Bank: ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९७ टक्के मतदान; उद्या होणार मतमोजणी

१२७ मतदार राहिले गैरहजर
Thane District Bank Election
Thane District Bank ElectionPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ संचालकांसाठी आज शांततेत मतदान झाले. चार हजार २५ मतदारांपैकी ३ हजार ८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत सहकार आणि परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत बंद केले.

विकास मतदार संघासाठी ९९. ७५ टक्के मतदान झाले तर महिला, इतर मागासवर्गीय, अनुसूचित आणि भटक्या जमाती मतदार संघांमध्ये प्रत्येकी ९६. ८४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होईल.

Thane District Bank Election
Fishermen Crisis: सागरी मच्छिमारी बंद; पोटासाठी मोलमजुरीची वेळ

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालकांपैकी १० संचालक बिनविरोध निवडून आले. उर्वरित ११ संचालकांसाठी आज मतदान झाले. ठाण्यापेक्षा पालघर जिल्ह्यात अधिक मतदार होते आणि तेथील ग्रामीण भागात खरी लढत पहायला मिळाली.

सकाळी आठ वाजल्यापासून १९ मतदान केंद्रात मतदानास सुरुवात झाली. शांततेत मतदान झाले. विकास मतदारसंघातील ४०३ मतांपैकी ४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पगारदार मतदारसंघात ७५८ पैकी ७४३ मतदारांनी, खरेदी विक्री , गृहनिर्माण संस्था २ हजार ८६४ पैकी २७५३ मतदारांनी मतदान केले.

Thane District Bank Election
Maldunge Ration Shop: मालडुंगेमधील रेशन धान्याची माहिती देण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ?

महिला, इतरमागास, अनुसूचित आणि भटक्या जमती मतदार संघात प्रत्येकी ४ हजार २५ मतदारांपैकी प्रत्येकी ३ हजार ८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी दिली.

सर्व पक्षीय सहकार पॅनल आणि भाजपप्रणित परिवर्तन पॅनल यांच्यात थेट लढत झाली. ओबीसी मतदार संघातील सहकार पॅनलचे उमेदवार स्वप्नील मुंबईकर, परिवर्तन पॅनलचे हार्दिक राऊत, निलेश सांबरे, प्रकाश भोईर व कैलास पाटील अशी पंचरंगी लढत झाली.

महिलांच्या दोन जागांसाठी सहकार पॅनलच्या नीता कांबळी, स्मिता घोडविंदे आणि परिवर्तन पॅनलच्या दिपाली पाटील, सुवर्णा पावशे यांच्यात थेट लढत झाली. भटक्या जमाती मतदारसंघात सहकार पॅनलचे निवृत्ती घुसेकर आणि परिवर्तन पॅनलचे राजेंद्र घोलप यांच्यात लढत झाली. गृहनिर्माण संस्था संस्था मतदारसंघात परिवर्तन पॅनलचे नगरसेवक सिताराम राणे आणि सहकार पॅनलतर्फे रंभाजी जगताप यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली आहे.

पगारदार सेवकांच्या मतदारसंघात सहकार पॅनलचे विशाल कुऱ्हाडे, परिवर्तन पॅनलचे प्रभू गोविंद पाटील आणि शेखर निकम यांच्यात तिरंगी झाली. या निवडणुकीला राजकीय रंग चढल्याने भाजप विरुद्ध भाजप अशी लढाई बघायला मिळाली.

ठाण्यातील सावित्रीदेवी थिराणी विद्यालय, वर्तकनगर, ठाणे येथे सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होईल. त्यामुळे बँकेवर सत्ता मिळविण्याचा सर्व पक्षीय नेते यशस्वी होतात की भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील हे त्यांना रोखण्यास यशस्वी होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विक्रमगडमध्ये तिरंगी लढत

विक्रमगडमध्ये संदीप पावडे, सुनील पाटील आणि निलेश सांबरे अशी तिरंगी लढत झाली. शहापूर तालुक्यामध्ये सहकार पॅनलचे प्रकाश वरकुटे, अनिल निचिते आणि विद्या वेखंडे अशी तिरंगी आणि जव्हारमध्ये सहकार पॅनलचे ज्योती पटेकर आणि बळवंत गावित यांच्यात थेट लढत झाली.

पालघरमधून सहकार पॅनलचे विद्यमान संचालक नागेश पाटील आणि अनिल गावड यांचा सामना रंगला. अनुसुचित जाती मतदारसंघात माजी खासदार बळीराम जाधव आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा हे एकमेकांविरोधात भिडलेले दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news