Fishermen Crisis: सागरी मच्छिमारी बंद; पोटासाठी मोलमजुरीची वेळ

काही कोळीबांधव करताहेत किनारी रापण
Fishermen Crisis
Fishermen CrisisPudhari
Published on
Updated on

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: हवामान खात्याकडून दरवर्षी खोलसमुद्रातील मासेमारी ३१ मे पासून बंद करण्याचे आदेश देते. परंतु ह्यावर्षी खराब हवामान असलयाने व मासळीचा दुष्काळ असल्याने मच्छिमार आपली बोट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४०० यांत्रिक बोटी किनाऱ्यावर ओढली. 

पुढील ३ महिने मासेमारी बंद असल्याने कोळी बांधव हैराण आहे. बोटीवरील कर्जाचे हप्ते फेडता येत नाही, मासळीचा दुष्काळ असल्याने घरात पैशाची चणचण पुढील २ महिने खायचे काय हा प्रश्न ? सद्य युवावर्ग समुद्रकिनारी रापण करून मासे पकडतात. त्यातही समुद्रात ऑइल आल्याने ती मासळीदेखील पाळली .शेवटचा पर्याय म्हणून सकाळी उठून मोलमजुरीवर जाण पसंत केले आहे.

Fishermen Crisis
Maldunge Ration Shop: मालडुंगेमधील रेशन धान्याची माहिती देण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ?

मुरुड व एकदरा येथील मच्छिमार अजूनही पारंपरिक पद्धती वापरून मासेमारी करतो. अद्यावत जाळी, अद्यावत बोटी, विकसित मासळी शोधक यंत्र याचा वापर मुरुड मच्छिमार करत नाही. कारण मिळालेली मासळी विकण्यासाठी मुरुड शहरात कोणतीही बाजारपेठ नाही अथवा मासळी साठवण्यासाठी कोल स्टोअरेज नाही गेली ५० वर्ष झाली मासेमारीसाठी आरक्षित बंदर नाही कि त्याठिकाणी एकत्र सर्व सुविधा उपलब्ध असतील.

आजही मुरुडच्या बोटी किनाऱ्यावर वाळूत लावाव्या लागत आहेत , साधी बोटीलावण्यासाठी जेटी नाही. पूर्वी म्हणजे २५ वर्ष आधी मुरुड बाजारपेठेत आर्थिक उलाढाल हि कोळी समाजावर होत असत पण आज कोळी समाज आर्थिक कोंडीत सापडला आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीला का वाटत नाही कि यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.

मुरुड व एकदरा खाडीत फिशरीष खात्याने ७ कोटी खर्च करून खाडीतील गाळ काढला होता व एकदरा येथे मासळी सुकवण्यासाठी जेटी बनवण्यात आली होती. स्थानिक कोळीबांधवना विचारात न घेता बांधण्यात आलेल्या जेटीला बोटी लागत नाही ,तिचा वापर मासळी सुकवण्यासाठीच होतो ,खाडीतील काढलेला गाळ २ वर्षात पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे.

Fishermen Crisis
Revdanda Agarkot Fort: रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या ‘वन बुरुजा’ची डागडुजी

ओहोटीला कोळी बांधवांच्या बोटी अडकतात व बोटींचे नुकसान होते. आता कोळी बांधवनसाठी ग्रॉइन बंधाऱ्याचे काम सुरु झाले आहे.त्याचा किती फायदा होणार ते येत्या काळात समजेल. 

सद्य पावसाळी पर्यटक सुरु झाल्याने पावसाळ्यात खडकातील चोंबोरी ,बॉबील ,छोटी मासळी बाजारात येते त्यासाठी छोट्या बोटी अगरदांडा खाडीत व राजपुरी खाडीत पोटापुरती मासळी पकडून पर्यटकांना खुश करत आहेत.अति पाऊस व वादळ असल्यास ते देखील मिळत नाही म्हणूनच कोळी बांधव पर्याय शोधूलागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news