KDMC News: अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख रेवडी निलंबित; केडीएमसी आयुक्तांचा मोठा दणका

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात अपयश
KDMC
KDMC pudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यात कसूर केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ग प्रभागाचे पथकप्रमुख कादर रेवडी यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा आयुक्तांनी आदेश जारी केला असून या कारवाईने महानगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडून शुक्रवारी हा निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त आणि ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटर प्रतिबंधित ना-फेरीवाला क्षेत्रात पूर्वसूचना न देता खासगी वाहनाने पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले.

KDMC
Mahad MIDC safety: एमआयडीसी सुरक्षा यंत्रणेची खा. तटकरे यांनी घेतली झाडाझडती

उर्सेकर वाडीतील मधुबन/पूजा गल्ली परिसरासह रेल्वे स्थानक परिसरात कर्मचारी उपस्थित असताना देखील या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले खुलेआम व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. पाहणी दरम्यान रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक व प्रवाशांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याचेही आढळून आले.

या संदर्भात पथकप्रमुख कादर रेवडी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. ही बाब कर्तव्यपालनातील गंभीर कसूर असून अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश आणि प्रशासकीय जबाबदारीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.

याची आयुक्त अभिनव गोयल यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या आदेशात नमूद केले आहे, या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कलम ५६ (१) (ब) अन्वये ग प्रभागाचे कामगार तथा पथकप्रमुख कादर रेवडी यांना आदेशाच्या तारखेपासून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात मुख्यालयातील अनधिकृत बांधकाम विभाग हे त्यांचे मुख्यालय राहील.

वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबित असताना खाजगी नोकरी किंवा धंदा अनुज्ञेय असणार नाही. नियमाप्रमाणे निलंबन काळातील निर्वाह भत्ता देय राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या या कारवाईमुळे डोंबिवली स्थानक परिसरात मोकाट सुटलेल्या फेरीवाल्यांवर आता महापालिका प्रशासनाचा वचक बसणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या या कारवाईमुळे डोंबिवली स्थानक परिसरात मोकाट सुटलेल्या फेरीवाल्यांवर आता महापालिका प्रशासनाचा वचक बसणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news