Gatari Amavasya 2026: सावधान! गटारी अमावस्या जवळ आली; सोडा-बॉटलची वृत्ती सिरियस घेऊ नका...पण एन्जॉय फुल करा

समाज माध्यमांवर चर्चेला उधाण
Gatari Amavasya 2026
Gatari Amavasya 2026Pudhari
Published on
Updated on

डोंबिवली: श्रावण महिना सुरू होण्याआधीचा मंगळवार ते बुधवार दरम्यान गटारी अमावास्येची समाज माध्यमांवर एकच चर्चा सुरू आहे. या दिवशी मच्छीचे कालवण, चिकनचा रस्सा आणि सोडा-बॉटलच्या बाटल्या आपोआपच ट्रेंडिंग होतात.

त्यामुळेच तरूणाईत या दिवसाला सोडा-बॉटल डे असेही नाव मिळाले आहे. मात्र यंदा समाज माध्यमांवर एकच संदेश व्हायरल होतोय. सावधान ! गटारी जवळ आली आहे. सोडा-बॉटल वृत्ती सिरियस घेऊ नका.

इंस्टाग्रामवर रील्सचा पूर आला आहे. कुणी मित्रांना टॅग करून प्लॅन ठरवतोय, तर कुणी बायकोच्या भीतीने गुपचूप प्लॅन कॅन्सल करतोय. मिम्समध्ये म्हटले जातेय की गटारी म्हणजे एक दिवसाचा परवाना आहे, पण त्याचा गैरवापर नको. एन्जॉय करा पण घरी सुखरूप परत या. हॉटेल आणि बारमध्ये आधीपासूनच बुकिंग फुल होऊ लागली आहे.

Gatari Amavasya 2026
Palghar Cow Slaughter Case: पालघरमधील गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश; २०० किलो गोमांसासह कार जप्त, तिघे अटकेत

मच्छी/मटण मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी वाढली आहे. व्यापाऱ्यांचा सांगण्यानुसार गटारीच्या एक दिवसात होणारी कमाई म्हणजे पूर्ण महिन्याची कमाई असते. तर दुसरीकडे पोलिस आणि केडीएमसी प्रशासनानेही कंबर कसली आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.

डॉक्टरही आवाहन करत आहेत की जास्त तिखट, जास्त तेल आणि जास्त दारूमुळे दवाखान्यात गर्दी नको. श्रावणात एक महिना उपवास आणि शाकाहाराचे व्रत असल्याने गटारीला विशेष महत्व आहे.

Gatari Amavasya 2026
Dombivli Doctor Assault Case: डॉक्टर रुग्ण सेवा करतात, त्यांच्यावर हात उचलणे चुकीचे; डॉक्टरांच्या वडिलांची प्रतिक्रिया

त्यामुळे हा दिवस सणासारखा साजरा करा, मित्रांसोबत धमाल करा, फोटो काढा, रील बनवा...पण मर्यादा सोडू नका. कारण गटारीचा खरा आनंद हा दुसऱ्या दिवशी डोकं न दुखण्यात आहे. एकूणच काय तर, सोडा घ्या पण जबाबदारीने घ्या. बॉटल उचला पण घरच्यांचा मान राखा. गटारी आली आहे, एन्जॉय करा...पण सिरियस होऊ नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news