Thane LPG Shortage: हातावर पोट असलेल्या कामगारांना गॅस टंचाईची झळ, गावी परतीचा प्रवास

उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने कामगारांचा गावी परतीचा प्रवास
Gas Shortage
Gas ShortagePudhari
Published on
Updated on

अर्जुन चेमटे

वागळे: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचे पडसाद आता थेट सामान्य नागरिकांवर उमटताना दिसत आहेत. त्यातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईची झळ ही हातावर पोट भरणाऱ्या कामगारांना लागली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने कामगारांनी आपल्या गावाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला आहे.

ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. परिणामी हॉटेल्स व उपहारगृहांवर बंदची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Gas Shortage
Chilli Price: मिरच्यांच्या वाढत्या दरामुळे घरगुती मसाला ठरतोय महागडा; कडक उन्हातही गृहिणींची लगबग

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी वाढवला असला तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठाणे शहरात वाढत्या उष्णतेसोबतच गॅसच्या तुटवड्याची समस्या अधिकच तीव्र बनत आहे. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या कामगारांना व छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. स्वयंपाकासाठी आणि रोजीरोटीसाठी आवश्यक असणारा गॅस वेळेवर मिळत नसल्याने अनेकांनी तात्पुरते आपले मूळ गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

Gas Shortage
Bhiwandi Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; वीटभट्टी मजूर पतीस अटक

शहरातील विविध भागांमध्ये गॅस सिलिंडर मिळण्यात होणारा विलंब, वाढती मागणी आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

चहा, वडापाव आणि हातगाड्यांवरील गॅसवर आधारित छोटे व्यवसाय ठप्प झाले असून आधीच उष्णतेमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनात या संकटाने आणखी भर घातली आहे. तरी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news