Gas Shortage Impact: गॅस टंचाईचा बदलापूरमध्ये कामगारांना फटका; सिलिंडरअभावी जेवणाचा प्रश्न गंभीर

इराण-इस्राईल संघर्षाचे पडसाद; 2 व 5 किलो सिलिंडर गायब, परप्रांतीय मजूर अडचणीत
LPG cylinder rate update
LPG cylinder rate updatefile photo
Published on
Updated on

बदलापूर : पंकज साताळकर

इराण आणि इस्राईल - अमेरिका युद्धामुळे भारतात सुरू झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सर्वसामान्य कामगारांपर्यंत येऊन ठेपला आहे. कमर्शियल सिलिंडर बंद झाल्यामुळे 5 किलोचे आणि 2 किलोचे सिलिंडर जेवणासाठी वापरणाऱ्या परप्रांतीय कामगारांना सिलिंडर मिळत नसल्याने जेवण बनवण्यासाठी आता त्यांची फरपट होत आहे.

LPG cylinder rate update
Mumbai Water Tax Hike: मुंबईत पाणीपट्टी वाढ अटळ? महापौरांच्या स्थगितीमुळे आर्थिक पेच

दोन किलोचा सिलिंडर अडीचशे ते तीनशे रुपयांना तर पाच किलोचा सिलिंडर पाचशे रुपयांपर्यंत यापूर्वी मिळत होता. मात्र गेल्या आठवड्याभरापासून मार्केटमध्ये हे सिलिंडर संपले आहेत. तसेच संपलेले सिलिंडरही रिफील करून मिळत नसल्यामुळे परप्रांतीय कामगारांची जेवण बनवण्यासाठी मोठी अडचण होत आहे.

बदलापूर एमआयडीसीत काम करणाऱ्या अर्जुन कुशवाह यांनी सांगितले की, आम्ही गेल्या दोन दिवसांपासून कमर्शियल पाच किलोचा सिलिंडर मिळेल या अपेक्षेने विविध दुकानात फिरत आहोत. मात्र आम्हाला अद्यापही कमर्शियल सिलिंडर मिळालेला नाही. तर काही जण हे कर्जत, मुरबाड, नेरळ आदी ग्रामीण भागात जाऊन कमर्शियल सिलिंडर घेऊन येत आहेत. मात्र त्यांची किंमतही हजार आणि दीड हजारांच्या पुढे गेल्यामुळे कामगारांना मात्र या कमर्शियल सिलिंडर बंद केल्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

LPG cylinder rate update
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिका सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपणात? ठाकरे गटाची मोठी मागणी

एमआयडीसीत राहणारे असंख्य कामगार हे एमआयडीसी परिसराच्या आसपास असलेल्या बैठ्या घरांमध्ये आणि चाळींमध्ये राहतात. एका व्यक्तीसाठी 5 किलोचा कमर्शियल सिलेंडर हा त्यांना जवळपास 25 दिवस ते महिनाभर पुरतो असे प्रत्येक कामगाराची स्वतंत्र गॅस शेगडी आणि सिलिंडर त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये असतात. सध्या एका खोलीत चार ते पाच मजदूर राहत आहेत. मात्र प्रत्येक जण आपापला स्वयंपाक वेगवेगळा करतात. पण सध्या गॅस टंचाईमुळे एकत्र स्वयंपाक करत असल्याचे अशोक शर्मा यांनी सांगितले. गॅसचा पुरवठा असाच बंद राहिल्यास या पुढील काळात कंपनीत काम करणे परवडणार नाही तसेच गॅस मिळत नसल्याने जेवण बनवण्यासाठी पर्याय नसल्याचेही कामगारांनी सांगितले.

कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक मालकांनी या कामगारांना जेवण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कमर्शियल सिलिंडर बाजारात कुठेच मिळत नसल्याने कामगारांसमोर जेवण बनवायचे कसे, असा मोठा प्रश्न पडला आहे.

LPG cylinder rate update
Mumbai Mayor Bungalow Renovation: डागडुजीनंतरच महापौरांचा बंगल्यात प्रवेश; 5 कोटींच्या नूतनीकरणावरून चर्चा

पुढील आठवड्याभरात जर हा गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर कामगारांना जेवणाअभावी कंपनीत जाणेही परवडणार नसल्यामुळे याचा फटका उत्पादनावरही होऊ शकतो.

परप्रांतीय कामगारांकडे घरगुती सिलिंडर नाहीच...

बदलापूर आणि आसपास असणाऱ्या एमआयडीसीतील अनेक परप्रांतीय कामगारांकडे जेवण बनवण्यासाठी घरगुती सिलिंडर उपलब्ध नाहीत. कारण अनेक मजूर हे ज्या ठिकाणी राहतात ते एका खोलीत चार ते पाच जण मिळून राहतात. ज्या कंपनीत काम करतात तेथेही त्यांच्या नोकरीची शाश्वती नसते. एका ठिकाणी कायम राहण्याचीही शाश्वती नसल्यामुळे गॅस सिलिंडर कायमस्वरूपी घेणे त्यांना परवडत नाही. तसेच अनेक परप्रांतीय मजुरांचे आधार कार्ड हे गावाकडील असल्याने त्यांना या ठिकाणी गॅस सिलिंडरही उपलब्ध होत नाहीत. मात्र आता कमर्शियल गॅस सिलिंडर पूर्णत: बंद झाल्यामुळे या कामगारांसमोर दोन वेळेस जेवण बनवण्याची ही मोठी अडचण निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news