

ठाणे : ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या रुग्णालयादरम्यान गुरुवारी (दि.28) प्रसुतीगृह, डायलेसिस व इतर संवेदनशील रुग्ण उपचार घेत असताना गुरुवारी संध्याकाळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने रुग्णालयातच्या आत ढोल ताशा वाजल्यामुळे रुग्ण बेहाल झाले.
आजवर कुठेही रुग्णालयाच्या आत ढोल ताशे वाजवण्याचा प्रताप करण्यात आलेला नव्हता. मात्र रुग्णालयातच हे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत तक्रार जरी करण्यात आलेली नसली तरीही संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गुरुवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील या रुग्णालयामध्ये ढोल ताशा वाजवण्यात आले. ज्यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय हेळसांड झाली. चौकशीत असे आढळून आले की, ढोल वाजवण्यात आलेला आहे. रुग्णालयात प्रसूती वॉर्ड आहेत जिथे नवजात बाळे झोपतात, त्याशिवाय डायलिसिस देखील केले जाते. रुग्ण अतिदक्षता विभाग असल्याची माहिती उपलब्ध आहे. रुग्णालयात सणासाठी वाजवलेले ढोल यातून सामाजिक एकात्मकता दिसली. मात्र यामुळे रुग्णांना याचा त्रास झाल्याचेही दिसून आले.