Aadhaar Biometric Update: आधार अपडेटअभावी शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधांमध्ये अडथळे

५ व १५ वर्षांनंतर एमबीयू आवश्यक; ७ ते १५ वयोगटातील मुलांचे अपडेट ३० सप्टेंबरपर्यंत मोफत
aadhar card ekyc
aadhar card ekycPudhari
Published on
Updated on

ठाणे: शाळेतील नोंदणी, शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक सुविधा तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेताना आधार क्रमांकाचा वापर होत असल्याने मुलांच्या आधारमधील माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

मात्र, वय वाढल्यानंतर बायोमेट्रिक माहिती अपडेट न केल्यास आधारशी संबंधित पडताळणीच्या प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांचे वय ५ आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधार बायोमेट्री अद्ययावत करून घेणे आवश्यक असून, पालकांनी आपल्या पाल्याच्या आधारची स्थिती तपासावी, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने केले आहे.

aadhar card ekyc
Palghar Weather: जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस; सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

लहान वयात आधार काढताना घेतलेली बायोमेट्रिक माहिती मुलाच्या वाढत्या वयानुसार बदलत असते. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसरे बाायोेट्रीक अपडेट करावे लागते.

या प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बोटांचे ठसे, दोन्ही डोळ्यांचे बुबुळांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र अद्ययावत केले जाते. विशेष म्हणजे, बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर मुलाचा आधार क्रमांक बदलत नाही.

सध्या ७ ते १५ वयोगटातील मुलांच्या पहिल्या बायोमेट्रीकचे शुल्क ३० सप्टेंबर २०२६पर्यंत माफ करण्यात आले आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ घेऊन पालकांनी आधार अपडेटची प्रक्रिया मुदतीपूर्वी पूर्ण करावी.

पालकांनी आपल्या मुलाचे बायोमेट्रिक अपडेट झाले आहे की नाही, याची अधिकृत आधार सेवेद्वारे तपासणी करावी. अपडेट प्रलंबित असल्यास मुलाला सोबत घेऊन अधिकृत आधार नोंदणी किंवा अपडेट केंद्रावरच जावे.

aadhar card ekyc
Vasai Virar Bio Mining Scam: ६४ कोटींच्या बायो-मायनिंग घोटाळ्यात कंत्राटदारावर गुन्हा; ३७.६६ कोटींच्या फसवणुकीचा एफआयआर

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळालेली पावती जतन करावी आणि अपडेटची स्थिती तपासावी. आधारशी संबंधित माहिती अद्ययावत नसल्याने शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी किंवा इतर शासकीय-शैक्षणिक प्रक्रियांमध्ये पडताळणी करताना अडथळे येऊ नयेत, यासाठी पालकांनी एमबीयूकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालकांनी हे लक्षात ठेवा

  • मुलाचे ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसरे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे.

  • ७ ते १५ वयोगटातील मुलांच्या पहिल्या अपडेटचे शुल्क ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत माफ आहे. त्यामुळे या कालावधीत प्रलंबित अपडेट करून घेणे फायदेशीर

  • बायोमेट्रिक अपडेटसाठी मुलाला सोबत घेऊन अधिकृत आधार केंद्रावर जावे.

  • बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन व छायाचित्र यासारखी बायोमेट्रिक अपडेट केली जाते.

  • अपडेटची पावती जतन करून आधारची स्थिती पुन्हा तपासावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news