Dahisar Metro inauguration : पहिल्या दहिसर मेट्रोचे आज लोकार्पण

मेट्रो रेल्वे 8 एप्रिलपासून प्रवासी सेवेत दाखल होणार; मिरा-भाईंदरमधील प्रवास होणार सुसह्य
Dahisar Metro inauguration
पहिल्या दहिसर मेट्रोचे आज लोकार्पणpudhari photo
Published on
Updated on

भाईंदर : राजू काळे

एमएमआरडीएच्या माध्यमातून दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प 9 मधील दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्पातील मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. 7 एप्रिल रोजी पार पडणार आहे. ठाणे जिल्ह्यातील या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या लोकार्पणानंतर त्याची प्रवासी सेवा 8 एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

दहिसर ते भाईंदर मेट्रो लाईन 9 अंतर्गत दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाच्या लोकार्पणानंतर एमएमआरडीएकडून 8 एप्रिल पासून या मार्गाला कनेक्टेड असलेल्या मेट्रो लाईन 2ए व 7 चे सुधारीत व अधिक प्रवासी अनुकूल वेळापत्रक जारी केले आहे. या अंतर्गत मेट्रो प्रकल्प 9 दहिसर पूर्व ते काशिगाव हा नवीन मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील सुरु झालेली हि पहिली मेट्रो सेवा ठरणार आहे.

Dahisar Metro inauguration
Mira Bhayandar Metro : मिरा भाईंदर मेट्रो लोकार्पणाचा मुहूर्त हुकला

अंधेरी पूर्व (गुंदवली) ते दहिसर पूर्व मेट्रो लाईन 7 व अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व मेट्रो लाईन 2 ए हि मेट्रो लाईन 9 सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालविण्यात येणार आहे, यामुळे प्रवाशांना अंधेरी पूर्व ते मिरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास करणे शक्य होणार आहे. त्याचे सुधारीत वेळापत्रक प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी, प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मेट्रो विस्तार लक्षात घेऊन एमएमआरडीएकडून तयार करण्यात आले आहे.

यातील पिवळी मेट्रो लाईन 2 ए अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व दरम्यानची मेट्रो लाईन स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहणार असून या मार्गावरील पहिली गाडी सकाळी 5:50 ते 5:55 वाजेदरम्यान धावणार आहे. तर शेवटची गाडी रात्री 10:35 ते 11 वाजेदरम्यान धावणार असून या मार्गावर गर्दीच्या वेळेत 6 मिनिटांच्या अंतराने दोन मेट्रो गाड्या धावणार आहेत. विना गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर मात्र 8 ते 10 मिनिटांचे राहणार आहे.

या मार्गावर प्रत्येक आठवड्यातील 6 दिवसांत एकूण 289 फेऱ्या केल्या जाणार असून रविवारी मात्र 231 फेऱ्या केल्या जाणार आहेत. याचप्रमाणे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो लाईन 7 व दहिसर ते भाईंदर लाईन 9 अंतर्गत दहिसर पूर्व ते काशिगाव मेट्रो लाईन 9 सुरू झाल्यानंतर ती मेट्रो लाईन 7 सोबत संयुक्त कॉरिडॉर म्हणून विस्तारित स्वरूपात कार्यरत राहणार आहे. या मार्गावर पहिली गाडी सकाळी 5:50 वाजता तर शेवटची गाडी रात्री 11 वाजता धावणार आहे.

आठवड्यातील 6 दिवस गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर 5:50 मिनिटांचे राहणार असून इतर वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर 8 ते 10 मिनिटांचे राहणार आहे. या मार्गावर आठवड्याच्या 5 दिवसांत एकूण 276 फेऱ्या तर शनिवारी एकूण 223 व रविवारी एकूण 205 फेऱ्या केल्या जाणार आहेत. या एकत्रित मार्गिकांमुळे (संयुक्त कॉरिडॉर) अंधेरी पूर्व ते काशिगाव दरम्यान प्रवाशांना थेट प्रवास शक्य होणार असून त्यांचा प्रवास अधिक जलद व सुसह्य होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

Dahisar Metro inauguration
Mumbai Metro: दोन मेट्रो मार्गिकांचे उद्या लोकार्पण! मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगराला मिळणार मेट्रो

दहिसर पूर्व स्थानकावरून प्रवासी, मेट्रो लाईन 2 ए आणि लाईन 7 व 9 दरम्यान सहज बदल करू (इंटरचेन्ज) शकणार असून त्यासाठी त्यांना स्टेशनबाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. या मेट्रोचा लोकार्पण सोहळा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार असून तत्पूर्वी हे लोकार्पण अनेकदा पुढे ढकलण्यात आले होते. यंदा मात्र त्याचा मुहूर्त निश्चित झाल्याने प्रामुख्याने मिरा-भाईंदरमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दुसरा टप्पा डिसेंबर 2026 अखेपर्यंत सुरु होणार

दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाल्यास येथील प्रवाशांना मुंबई पूर्व व पश्चिम उपनगर, विमानतळ, कुलाबा, छत्रपती शिवाजी टर्मिनस या महत्वाच्या ठिकाणी जलद व वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या मेट्रो मार्गावरील तिकिटाचे दर तूर्तास 16 रुपये निश्चित करण्यात आले असून ते स्थानिक प्रवाशांना परवडणारे असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. तर काशिगाव ते भाईंदर पश्चिम दरम्यानचा दुसरा टप्पा डिसेंबर 2026 अखेपर्यंत सुरु होणार असल्याचा दावा देखील एमएमआरडीएकडून करण्यात आला असून त्या दिशेने मेट्रोचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news