Mumbai Metro: दोन मेट्रो मार्गिकांचे उद्या लोकार्पण! मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगराला मिळणार मेट्रो

दहिसर ते गुंदवली मेट्रो-7 मार्गिकेचा उत्तर टोकाकडील विस्तार म्हणजे मेट्रो-9 मार्गिका. या मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या वर्षअखेरीस पूर्ण झाले होते.
Mumbai Metro
Mumbai MetroPudhari
Published on
Updated on

मुंबई: सुरक्षा प्रमाणपत्र मिळूनही लोकार्पण रखडलेल्या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण अखेर मंगळवारी केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

दहिसर ते गुंदवली मेट्रो-7 मार्गिकेचा उत्तर टोकाकडील विस्तार म्हणजे मेट्रो-9 मार्गिका. या मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या वर्षअखेरीस पूर्ण झाले होते. जानेवारीत सीएमआरएस प्रमाणपत्रही मिळाले. तसेच अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो 2 ब मार्गिकेच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्याला सीएमआरएस प्रमाणपत्र मिळूनही लोकार्पण रखडले आहे.

Mumbai Metro
Fake Letter Scam: बोगस शुभेच्छापत्र पाठवून पंतप्रधानांच्या नावाचा दुरुपयोग; दोन आरोपींना अटक

मेट्रो-9 सुरू झाल्यास गुंदवलीपासून थेट काशिगावपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. तसेच मेट्रो-2 ब सुरू झाल्यास पूर्व उपनगराला पहिली मेट्रो मिळणार आहे. मेट्रो-2 ब मार्गिकेचा पहिला टप्पा 5.53 किमी लांबीचा आहे, तर मेट्रो-9 मार्गिकेचा पहिला टप्पा 4.4 किमीचा आहे.

7 एप्रिलला सकाळी 10 वाजता दहिसर पूर्व मेट्रो स्थानकात लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता मानपाडा, ठाणे येथे बोरिवली-ठाणे दुहेरीबोगद्याचा टीबीएम लॉन्च कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 वाजता डायमंड गार्डन मेट्रो स्थानकात मेट्रोच्या लोकार्पणासह पॉड टॅक्सीचे ई-भूमिपूजन केले जाईल.

Mumbai Metro
Haffkine Vaccine: हाफकिनच्या लसींचे स्वामित्व हक्क अंशत: विकणार; जागतिक निविदा जारी झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त

पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

वांद्रे रेल्वे स्थानकापासून ते कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या प्रवासाची सोय यामुळे होईल, असे सांगितले जाते. या प्रकल्पाची उभारणी आणि संचालन करण्यासाठी वर्षभरापूर्वीच संस्थेची नियुक्ती केली आहे. मेट्रो प्रकल्पांच्या लोकार्पणासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news