२४ महिलांचे फेसबूक अकाऊंट हॅक; हॅकरला लातूरमध्ये ठोकल्या बेड्या

२४ महिलांचे फेसबूक अकाऊंट हॅक; हॅकरला लातूरमध्ये ठोकल्या बेड्या

ठाणे; संतोष बिचकुले :  गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बाबतीत घडणाजया गुन्ह्यांमुळे संताप व्यक्त होत असताना आता एका विशेष ॲपद्वारे २४ महिलांचे अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईच्या व्ही. पी. रोड पोलिसांनी लातूरमध्ये आरोपी अजय ऊर्फ विनोद मुंडे (२५, रा. परभणी) याला बेड्या ठोकल्या. या आरोपीने अकाऊंट हॅक केलेल्या महिलांचे फोटो पॉर्न साईड वायरल झाल्याच खोटे सांगत त्यांच्याकडून हजारो रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मुंडे याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.

कोरोना संकट काळात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊ नमुळे नागरिक घरात बसून होते. सतत घरात राहून सर्वच जण बोर झाले होते. त्यामुळे टाईमपास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सोशल मीडियाकडे वळले. या नागरिकांपैकी एक असलेल्या अजय ऊर्फ विनोद मुंडे हादेखील सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहू लागला. सोशल मीडियावर सर्च करताना त्याला एका अॅपची माहिती समजली. त्या अॅपद्वारे तो फेसबुक वापरणाजया महिलांना विशेष लिंक पाठवू लागला. सदर लिंक ओपन करताचा महिलांच्या मोबाईलचा अॅक्सेस त्याच्या हाती लागत असे. हीच संधी साधून हॅक केलेल्या अकाऊंटद्वारे महिलेच्या इतर मैत्रिणींना तो टार्गेट करू लागला. तुमचा फोटो, व्हिडीओ पॉर्न साईट्सवर वायरल झाल्याचे त्यांना सांगू लागला.. हे ऐकताच क्षणी महिला हादरून जात.. त्या महिलांना धिर देत त्यांचे फोटो व व्हिडीओ डिलिट करण्यासाठी किमान ५ हजारांची मागणी करायचा

फेसबूक फेंड समजून अनेक महिलांनी सहज विश्वास ठेवत आर- पीला आपला व्हॉट्स अॅप नंबर दिला. समाजात बदनामी टाळण्यासाठी व्हॉट्स अॅपवर प्राप्त होणाजया माहितीनुसार आरोपीच्या बँक खात्यावर महिला पैसे ट्रान्सफर करू लागला. पैसे जमा होताच तो महिलांना फोटो, व्हिडीओ डिलिट झाल्याचे मेसेज पाठवत असे. अशाच प्रकारे आरोपीने गिरगाव परिसरातील एका महिलेला ७ हजार रुपयांना गंडवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या गुन्ह्याचे स्वरूप पाहता अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना हवालदार मुन्ना सिंह यांना आरोपी लातूरमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा लावून आरोपी अजय ऊर्फ विनोद मुंडे याच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news