

Extra bus from Thane section for Ashadhi Wari
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. पण सगळ्यांना काही दिंडीत चालणं जमत नाही, अशा भक्तांसाठी लालपरीने पंढरीला जाण्यासाठी सोय केली आहे.
६ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या ठाणे विभागातील सर्व आगारातून २ जुलै पासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच ६ ते १३ जुलै दरम्यान पंढरपूर येथून भाविकांसाठी परतीच्या वाहतूकीची सोय करण्यात आली आहे.
ठाणे विभागातील ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, बोरिवली (नॅन्सी कॉलनी) येथून २ जुलै पासून पंढरपूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहे.
त्यासाठी वैयक्तीक व समूह पध्दतीने आरक्षणाची सोय महामंडळाने केली आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजनांचा लाभही संबंधित प्रवाशांना या सेवेत घेता येणार आहे.
बस सुटण्याची वेळ
बोरिवली-सायन पंढरपूर सकाळी ८ वा. व रात्री ८ वा.
ठाणे - फलटण - पंढरपूर सकाळी ७ वा. व रात्री ८ वा.
कल्याण फलटण पंढरपूर सकाळी ६ वा. व सायं. ७ वा.
शहापूर- ठाणे फलटण- पंढरपूर सकाळी ६ वा.
विठ्ठलवाडी नगर फलटण पंढरपूर रात्री ९ वा.
कल्याण- नगर फलटण- पंढरपूर रात्री ९ वा.
विठ्ठलवाडी नगर फलटण पंढरपूर रात्री ८ वा.
वाडा- ठाणे पुणे पंढरपूर सायंकाळी ६ वा.