Kalyan Crime : सुसाईड नोटमुळे जीवन संपवल्याचा उलगडा

कामावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून छळ; गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

कल्याण : सुसाईट नोटमुळे पाच महिन्यानंतर एका ३३ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येचा उलगडा झाला आहे. पंकज बडगुजर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा वरिष्ठ अधिकारी त्याचा मानसिक छळ करीत असल्याचा उलगडा झाला आहे. पाच महिन्यानंतर पंकजच्या आईवडिलांना पंकजने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. कल्याण रेल्वे पोलिसांनी पंकजच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण नजीकच्या शहाड सेंचुरी परिसरात राहणारा ३३ वर्षीय पंकज बडगुजर हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका नामांकित खाजगी कंपनीत कामाला होता. १९ सप्टेंबर २०२५ रोजी तो कामाला लागला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र काही दिवसांतच कामाच्या ठिकाणी त्याला वरिष्ठांकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची जाणीव त्याच्या कुटुंबाला झाली. ७नोव्हेंबर २०२५ रोजी पंकजने अचानक वडिलांना आपण नोकरी सोडल्याचे सांगितले, मात्र त्यामागचे नेमके कारण त्याने कोणालाही सांगितले नाही.

Crime News
Manwat Murder Case | अंगाचा थरकाप उडविणारे हत्याकांड; मानवत मर्डर्स! अंधश्रद्धेचा रक्तरंजित इतिहास

यानंतर १३ डिसेंबर २०२५ रोजी कंपनीचे ओळखपत्र जमा करण्यासाठी पंकज कंपनीत गेला होता. तिथून घरी परतत असताना तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्याच रात्री जेवण झाल्यानंतर "बाहेर जाऊन येतो" असे सांगून तो घरातून बाहेर पडला, तो घरी परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांना शहाड रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. तपासाअंती तो मृतदेह पंकज याचा असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी या प्रकरणी रेल्वे अपघाताची नोंद केली होती. आपला मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, असा विश्वास त्याच्या वडिलांना होता. अखेर पाच महिन्यांनंतर वडिलांच्या हाती पंकजने लिहिलेली एक सुसाईड नोट लागली.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar crime : सिडको ठाण्याच्या 100 फुटांवर तरुणाची हत्या, तब्बल 7 तासांनंतर पोहोचले पोलिस

या पत्रात पंकजने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याचा कशाप्रकारे मानसिक छळ केला जात होता, याची सविस्तर हकीकत लिहून ठेवली होती. हे पत्र पाहताच वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने कल्याण रेल्वे पोलिसात धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी पंकजच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news