Bhiwandi Crime : शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या

सामूहिक अत्याचाराचा स्थानिकांचा आरोप; भिवंडी तालुक्यातील घटना
Bhiwandi Crime
शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्याpudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेतावर गेलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची अत्याचार करून नंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील ही दुर्दैवी वृद्ध महिला दुपारी बारा वाजता च्या सुमारास आपल्या शेतावर गेली होती. त्यावेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी शेतावर धाव घेतली. त्यावेळेस वृद्ध महिला ही निपचित पडली होती. कुटुंबीयांनी ही बाब स्थानिक गणेशपुरी पोलिसांना कळविल्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल होत त्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी घेऊन आले.

विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्या मध्ये असलेले सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ही चोरीला गेले नसल्या मुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने नसून त्या महिले वर अत्याचार करून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. हत्येच्या घटने नंतर त्या परिसरातून तीन जणांना पलायन करताना काही जणांनी पाहिल्याचे सांगितल्याची माहिती हत्या झालेल्या वृद्ध महिलेच्या मुलाने दिली असून, पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

Bhiwandi Crime
New voters registration : नव मतदार नोंदणीस निवडणूक आयोगाचा खोडा?

प्रथमदर्शनी पुरावे पाहता वृद्ध महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची केलेली हत्या ही अत्यंत निंदनीय घटना आहे. हत्या झालेली महिला भविष्यात आरोपींना ओळखेल या भीतीने अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली. देशात व राज्यात अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारां वर पोलिस व शासन यंत्रणेचा धाक राहिलेला नाही त्यामुळे असे प्रकार दररोज घडत आहेत. ही घटना समाजासाठी लज्जास्पद अअसल्याचे बोलले जात आहे.

आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी

पोलिसांनी तत्काळ शारीरिक अत्याचार व हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड किरण चन्ने यांनी केली आहे. गणेशपुरी पोलिसांसह ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिनव मित्तल, उपविभागीय अधिक्षक राहुल झालटे यांनी घटनास्थळासह रुग्णालय तेथे भेट दिली असून या शारीरिक अत्याचार व हत्येचा गुन्हा गणेशपुरी पोलीस ठाण्यात नोंद करून गांभीर्याने तपास सुरू केला आहे.

Bhiwandi Crime
Raigad News : ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news