

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | ठाणे येथील चरई परिसरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी रमजानच्या समाप्तीनिमित्त ईदची नमाज अदा केली. ही एक विशेष सामूहिक प्रार्थना आहे, जी रमजानच्या महिन्याभराच्या उपवासानंतर केली जाते. चरई परिसरात पारंपारिकपणे ईदची नमाज अदा करण्यासाठी समाजबांधव एकत्र आले आहेत.
ईदची नमाज ही एक महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे. या नमाज पठणानंतर सर्व बांधवांनी एकमेकांना 'ईद मुबारक' म्हणत गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या.
ईदच्या पूर्वसंध्येला ईदनिमित्त खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत बांधवांनी गर्दी केल्याचे दिसून आले. भारतात तसे जगात शांतता नांदण्यासाठी सामुहीक प्रार्थना करण्यात आली. दरम्यान नमाज पटनानंतर सर्व धर्मीय समाज बांधवांकरीता प्रार्थनेनंतर प्रवचन (खुत्बा) दिले जाणार आहे.