

Career Guidance Event
ठाणे : करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर असलेल्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'दैनिक पुढारी'ने 'एज्यू दिशा' या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असून, विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. ३० व ३१ मे रोजी ठाण्यातील हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमात करिअरची दिशा ठरवताना विचारात घ्यावयाचे घटक, उपलब्ध अभ्यासक्रम व पुढील शैक्षणिक प्रवासाविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे.
बदलत्या काळानुरूप शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. पूर्वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान एवढ्याच शाखा आता मर्यादित राहिल्या नसून, करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशा संधींविषयी विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन या शिबिरात मिळणार आहे. शिबिरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्टस्, कॉमर्स, सायन्स, लॉ, कृषी, फार्मसी, आर्मी, पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी, चार्टर्ड अकाउंटंसी, बँकिंग, पत्रकारिता, अॅनिमेशन, डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, पर्यटन, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रांमधील संधी व अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
या शिबिराचे प्रायोजक संजय घोडावत युनिव्हर्सिटी व सहप्रायोजक पारूल युनिव्हर्सिटी हे आहेत. तसेच गरवारे इन्स्टिट्यूट, वेलिंगकर इन्स्टिट्यूट, ऍमिटी युनिव्हर्सिटी, सहयोग कॉलेज व हॉस्पिटॅलिटी, मुंबई विद्यापीठ, विश्वा मेडिकल, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, कर्नावट क्लासेस, एईसीसी कन्सल्टन्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई), महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी), फ्युचर वर्सिटी, जीबी एज्युकेशन अशा शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्थांचाही सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत होणार आहे.
वेळ विषय वक्ते
१०.०० ते ११.०० उद्घाटन समारंभ संजय केळकर (आमदार, ठाणे)
११.०० ते १२.०० स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन रविंद्र शिसवे (भापोसे)
१२.०० ते १.०० शिक्षण क्षेत्रातील बदल, संधी श्रुती दुचे, महेश गायकवाड, कुणाल देवकर
२.०० ते २.३० हॉटेल व दुरिझम मॅनेजमेंट संधी शेफ प्रीतम गुप्ते
२.३० ते ३.१५ योग्य करियर कसे निवडावे प्रजेश त्रोस्की
३.३० ते ४.०० वैद्यकीय क्षेत्रातील विविध संधी वर्षा कळांबे
४.०० ते ४.३० डेटा ऍनालिटिक्स, सॉफ्ट स्किल्स भानु प्रताप सिंग
४.३० ते ५.०० परदेशातील करियर संधी पूजा नागदेव
५.०० ते ५.३० तंत्रशिक्षणातील संधी वंदना वानखेडे
७.०० ते ७.३० यूपीएससीसाठी यशाचा मंत्र विश्वास नांगरे पाटील (भापोसे)
वेळ विषय वक्ते
११.०० ते ११.३० पत्रकारिता व माध्यम क्षेत्रातील संधी देवेंद्र भुजबळ
११.३० ते १२.०० करियर निवडताना मनाची मानसिकता डॉ. शैलेश उमाटे
१२.०० ते १२.३० १२ वी नंतरच्या नवनवीन संधी प्रा. सचिन वेदपाठक
१२.३० ते १.०० वाणिज्य व कला शाखेतील संधी प्रा. सचिन कर्णावट
१.३० ते २.०० एआय तंत्रज्ञान, कौशल्य विकास कोर्सेस शुभ्रा नायक, किशोरी तेलवेकर
२.०० ते २.४५ परदेशातील करियर संधी ऊर्मिल गाला
३.०० ते ३.४५ चार्टर्ड अकाउंटंट-तयारी व संधी सीए सुयोग नार्वेकर
४.०० ते ४.३० डिजाईनिंग क्षेत्रातील संधी मीनाक्षी अरविंद
हस्ताक्षरावरून कोणते क्षेत्र निवडावे किंवा योग्य करियर कसे निवडावे याचे सखोल मार्गदर्शन सुप्रसिद्ध ग्रॅफोलॉजी तज्ज्ञ प्रजेश त्रोस्की करणार आहेत, तसेच या प्रदर्शनात लाखो विद्यार्थ्यांच्या पसंतीस पडलेले प्रजेश त्रोस्की यांचे करियर का रास्ता या चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा ? त्यांच्या आवडीनुसार कोणत्या करिअरमध्ये उज्ज्वल भविष्य आहे? कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात ? हे सर्व प्रश्न मार्गदर्शन सत्रांमध्ये सुटतील. विशेष म्हणजे, या उपक्रमात विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा जीवनप्रवास व अनुभव विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. 'एज्यू दिशा' कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस निश्चितच दिशा देणारा आणि निर्णय घेण्यास मदत करणारा ठरेल.
शिबिरास येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला लोणावळा येथील 'वेट एन जॉय' वॉटरपार्क व अम्युझमेंट पार्कचे ३५ टक्के सवलतीचे कुपन्स देण्यात येणार आहेत.
एज्यु दिशा करियर मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असले तरी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी बातमी सोबत देण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करून, उघडणारा गुगल फॉर्म भरून नोंदणी निश्चित करायची आहे.