EDU दिशा : कंत्राट पद्धतीतून नोकरीचे फायदे

Published on
Updated on

खासगी आणि सरकारी पातळीवर विविध प्रकारचे प्रकल्प, योजना राबविल्या जातात. या योजनेच्या कामासाठी संबंधित संस्थेला कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचारी हवे असतात. कारण तो प्रकल्प किंवा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्‍याची गरज भासत नाही. कधी-कधी कामगिरी पाहून कंत्राटी कर्मचार्‍याचे कायमस्वरूपी कर्मचार्‍यांत स्थानांतर होते. अशा स्थितीत कंत्राटीचा काळ हा सेवाकाळही गृहीत धरला जातो. म्हणून कोणत्याही संस्थेत, कंपनीत, संघटनेत काम करताना कंत्राटी पद्धतीने काम करणे फायद्याचे ठरते.

खासगी किंवा सरकारी कार्यालयात नियमितपणे कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नियुक्‍ती केली जाते. हे कंत्राट किमान सहा महिन्यांचे तर कमाल पाच वर्षांपर्यंतचे असू शकते. काही ठिकाणी आठवड्यासाठी किंवा महिन्यासाठी देखील कंत्राटी कर्मचारी नेमले जातात. कामाच्या स्वरुपावर त्याचा कालावधी अवलंबून असते. तसे पाहिले तर खासगी आणि सरकारी पातळीवर विविध प्रकारचे प्रकल्प, योजना राबविल्या जातात. या योजनेच्या कामासाठी संबंधित संस्थेला कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचारी हवे असतात. कारण तो प्रकल्प किंवा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्‍याची गरज भासत नाही. कधी कधी कामगिरी पाहून कंत्राटी कर्मचार्‍याचे कायमस्वरुपी कर्मचार्‍यांत स्थानांतरण होते. अशा स्थितीत कंत्राटीचा काळ हा सेवाकाळही गृहीत धरला जातो. म्हणून कोणत्याही संस्थेत, कंपनीत, संघटनेत काम करताना कंत्राटी पद्धतीने काम करणे फायद्याचे ठरते. हे कंत्राट नोकरीच्या अनुभवासाठीही उपयुक्‍त ठरते. याशिवाय 58 वर्षांचे देखील कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी, अधिकारी नेमले जात आहेत. या कंत्राटातील  बहुतांश अटी, नियम हे कायमस्वरुपी कर्मचार्‍यांचेप्रमाणेच लागू असतात. मात्र, काही नियमांत वेतनवाढ, निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधांमध्ये बदल असतो. कंत्राटी पद्धतीचे आणखी काही फायदे सांगता येतील.

वेतनाच्या अटी : काही क्षेत्रात उदाहरणार्थ आयटी क्षेत्रात कायमस्वरुपी नोकरीपेक्षा कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या नोकरदारांना अधिक वेतन मिळते. एवढेच नाही तर मासिक कंत्राटापेक्षा आठवड्याच्या कंत्राटी कामात अधिक फायदा मिळतो. कंत्राट असल्याने वेतनाला कोणतीही अडचण येत नाही. दोन्ही बाजूंना मान्य असलेल्या गोष्टींचा कंत्राटात समावेश असतो. त्यानुसार कमी कालावधीत अधिक उत्पन्‍न मिळवण्याचे साधन म्हणूनही करारपद्धत उत्तम मानले जाते. 

कामात लवचिकता : कायमस्वरुपी काम करणार्‍या नोकरदारांना वर्षभरात चार ते पाच आठवडे सुट्टी मिळते. कंत्राटी पद्धतीत कामात लवचिकता असल्याने कंत्राटदार हा कंत्राटी कर्मचार्‍यांना सुट्ट्यांमध्ये आणखी शिथिलता बहाल करू शकतात. एखादे काम किंवा योजना पूर्ण झाल्यानंतर मनाप्रमाणे सुट्टी घेता येते. कालांतराने नव्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम सुरू करता येते. प्रत्येक ठिकाणी सुट्ट्यांच्या अटी आणि नियम वेगळे असतात. त्याचाही काहीवेळा लाभ मिळतो. 

वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव : कंत्राटी काम हे साधारणपणे एखाद्या प्रकल्प, योजनेपुरते मर्यादित असतात. पहिले कंत्राट झाल्यानंतर दुसर्‍या योजनेवर काम करण्यासाठी कर्मचार्‍यांना पाठविले जाते. म्हणजेच विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वातावरणात काम करण्याचा अनुभव कर्मचार्‍यांना मिळतो. प्रत्येक कंपनीची, संस्थेची कामाची शैली परस्परापासून वेगळी असते. यातूनही कर्मचार्‍यांत कौशल्य विकास होतो. काहीवेळेस आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करताना परदेशातही जाण्याची संधी मिळते. परिणामी देश-विदेशातही काम करण्याचा अनुभव कंत्राटी पद्धतीमुळे मिळतो आणि चांगले करिअर विकसित होते. कायमस्वरुपी कर्मचारी हा एकाच कंपनीत, एकाच ठिकाणी काम करतो आणि तेथेच निवृत्त होतो. त्याच्या वेतनातही महागाई दराच्या तुलनेत वाढ होत नाही. याउलट कंत्राटी कर्मचारी हा नव्या ठिकाणी वेतनवाढ घेऊ शकतो, तसेच नवे तंत्रही शिकू शकतो.

काम निवडीचे स्वातंत्र्य : कंत्राटी पद्धतीने काम करताना आपल्याला जबाबदारी निवडीचे स्वातंत्र्य असते. अनेक कंपन्या विविध प्रकारच्या नोकरीच्या ऑफर करत असतात. आपल्याला आवडणारे काम निवडून कंत्राटी पद्धतीने रुजू होऊ शकतो. काहीवेळा कंपनी थेटपणे कर्मचार्‍यांची भरती करते तर काही ठिकाणी एजंटमार्फत कर्मचार्‍यांना घेतले जाते. अशावेळी आपण थेट कंपनीशी संपर्क ठेवल्यास कामाची हमी, अधिक वेतन मिळण्याची शाश्‍वती राहते. तसेच एंजटला दलालीही देण्याची गरज भासत नाही. मात्र, काही कंपन्या एजंट किंवा भरती मंडळामार्फतच कर्मचार्‍यांची भरती करतात. कामासाठी स्थान निवडीचेही स्वातंत्र्य मिळते. देशाच्या विविध भागांत किंवा देशाबाहेरही काम करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. 

संधी : अनेक कंपन्या भरती करताना सुरुवातीला कंत्राटी आणि नंतर कायमस्वरुपी नोकरी देण्याची ऑफर तरुणांना देत असतात. कंत्राटीच्या कालावधीत एखाद्या कर्मचार्‍याने चांगली कामगिरी केली असेल तर त्याला भविष्यात कायमस्वरुपी कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळते. याशिवाय कंत्राटीचा कालावधी कायम स्वरुपी होताना गृहीत धरला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news