Dr. Yashwantrao Dalvi Passes Away : समाजवादी नेते माजी आमदार डॉ. य. बा. दळवी यांचे निधन

गोरगरिबांचा आधार : वैद्यकीय क्षेत्रामध्ये 60 वर्षे सामाजिक सेवा
ठाणे
ज्येष्ठ समाजवादी नेते कणकवली मालवणचे माजी आमदार, सिंधुदुर्ग मराठा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी तथा डॉ. य. बा. दळवीPudhari News Network
Published on
Updated on

Senior socialist leader Bhani Kankavli-Former MLA of Malvan Dr. Yashwantrao Babaji Dalvi and Y. Ba. Dalvi passed away today (August 17) in Mumbai due to old age.

ठाणे : ज्येष्ठ समाजवादी नेते कणकवली मालवणचे माजी आमदार, सिंधुदुर्ग मराठा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी तथा डॉ. य. बा. दळवी यांचे रविवारी (दि.17) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

ठाणे
Anil Kumar Pawar: अनिलकुमार पवार लाचेची रक्कम वितरित करण्यासाठी करत होते कोडवर्डचा वापर; ईडीचा दावा

सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळ, कळसुली शिक्षण संस्था यांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कळसुलीसारख्या ग्रामीण भागामध्ये तब्बल 60 वर्षे त्यांनी सामाजिक हेतूने सेवा केली. त्यांचा नुकताच 100 वा वाढदिवस साजरा झाला होता. त्यांच्या जाण्याने एक समाजसेवेचे व्रत घेतलेले आदर्श व्यक्तिमत्व पडद्याआड गेले आहे. 1962 ते 65 या काळात ते आमदार होते. त्यांचे अलीकडच्या दोन वर्षात मुंबईत वास्तव्य होते. त्या पूर्वी ते कळसुली येथे वैद्यकीय सेवा करत होते.

खर्‍या अर्थाने सामाजिक सेवेचे व्रत घेउन निष्ठेने काम करणार्‍या समाज धुरिणांपैकी ते एक होते. आदर्श राजकारणी, आदर्श सामाजिक कार्यकर्ते, लोक चळवळीचे नेते अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू होते. त्यांच्या निधनाबद्दल सिंधुदुर्ग मराठा मंडळाने दु:ख व्यक्त केले आहे. एक जनमानसातील नेता, शेतकर्‍यांचा कैवारी, अशी त्यांची ओळख होती. त्यांचे जाणे हे सर्वसामान्य माणसाला चटका लावणारे आहे. गोरगरिबांनी त्यांचा आधार गमावला आहे. वैद्यकीय सेवेचा एक नवा आदर्श त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी निर्माण केला होता. लोकांसाठी जगणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news