Ramesh Mhatre Case: रमेश म्हात्रे प्रकरणी पुढील सुनावणी २१ सप्टेंबरला

सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविली
Ramesh Mhatre
Ramesh MhatrePudhari
Published on
Updated on

कल्याण: डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे यांच्या खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र जलदगती न्यायालयात सुरू आहे.

शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणातील एका सरकारी साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ सप्टेंबरला होणार आहे.

Ramesh Mhatre
Ulhasnagar Crime News: पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

डॉक्टरांना मारहाण करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप असलेले रजिस्टर पोलिसांनी जप्त केले होते. या रजिस्टरच्या जप्तीचा पंचनामा करण्यात आला होता. याच जप्ती प्रक्रियेशी संबंधित सरकारी साक्षीदाराची साक्ष शनिवारी न्यायालयामध्‍ये नोंदविण्यात आली.

सुनावणीच्या वेळी आरोपी रमेश म्हात्रे न्यायालयात उपस्थित होते. आरोपीच्या वतीने ॲड. अनंत पत्की, ॲड. एम. के. काझी आणि ॲड. यू. झेड. काझी यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी काम पाहिले.

Ramesh Mhatre
Mira Road Kidnapping Case: पाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण; चारचाकीत कोंबून बेदम मारहाण

जिल्हा सत्र न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयात ही साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news