

कल्याण : एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकाचे जीवनमान उचावण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प दळवळनासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात असताना मात्र दुसरीकडे डोंबिवली कल्याणच्या सीमेवर असलेल्या डोंबिवली पूर्वेतील देशमुख होम्स मधील सिद्धिवानायक रेसिडन्सी या सोसायटीतील रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दिवसभरातून केवळ पंधरा मिनिट पाणी येते त्यातच 6 व्या आणि 7 व्या मजल्यावर तर पाणी पोहचत नाही. त्यात लाईट गेली तर पाण्याचा एक थेंब सुद्धा मिळत नाही अशा व्यथा देशमुख होम्समधील महिलांनी व्यथा मांडीत अपुऱ्या मिळणारा पाणी पुरवठा रात्र रात्रभर झोप येत नसल्याची व्यथा मांडताना महिला वर्गाला आपले डोळ्यातील अश्रू आवरत नव्हते.
पाण्यासाठी महिलांच्या व्यथा ऐकून माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी तत्काळच्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना फोन लावून महिलांच्या समस्यांचा पाढा वाचल्याने खासदारांनी येत्या काही दिवसात देशमुख होम्समधील पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
कल्याण पूर्वेतील देशमुख होम्समधील सिद्धीविनायक रेसिडेन्सीमधील नागरीकांनी तीव्र पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासोबत एका बैठकीचे आयोजन केले हेाते. या बैठकीत नागरीकांनी त्यांच्या सोसायटीला सगळयात जास्त पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. विशेषत: महिला वर्गाने पाणीटंचाई व्यथा मांडली.
महिलांनी सांगितले की, सोसायटीला पाणी येत नाही. केवळ पंधरा मिनीटेच पाणी मिळते. सहाव्या आणि सातव्या मजल्यावर पाणी पोहचत नाही. त्यात लाईट गेली तर अजिबात पाणी मिळत नाही. घरीच कामे तसेच राहतात. त्यात काही महिला या नोकरी करणाऱ्या आहेत. पाणी येत नसल्याने घरची कामे कशी करायची या व्यथेने ग्रासले आहे. टँकरचा खर्च सगळ्यांनाच परवडणारा नाही.
आमच्या सोसायटीतील पाणी समस्या सोडविण्यासाठी आजमिती पर्यंत खासदार आमदार स्थानिक नगरसेवक, एमआयडीसी व पालिका अधिकाऱ्याच्या कार्यालयाची उंबरठे झिजवूनही पाणी समस्या कोणीही सोडवू शकले नसल्याची माहिती महिलांनी दिल्याने व्यथा मांडल्या.