Narcotics Bust Belgaum | अमली पदार्थ विक्री; सहाजणांना अटक

दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
Narcotics Bust Belgaum
कंग्राळी बुद्रूक : जप्त केलेली कार व संशयितासमवेत पोलिस. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : शहर परिसरात अमली पदार्थ विक्री करणार्‍यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. रविवारी (दि. 29) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचे गांजा व हेरॉईनसह वाहने जप्त केली.

सीसीबी पोलिसांनी एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर-कंग्राळी बुद्रूक मुख्य रस्त्यावर कारमधून गांजाची विक्री व वाहतूक करणार्‍याला अटक केली. मनोहर ऊर्फ बाळू गजानन हुद्दार असे त्याचे नाव आहे. मनोहर कारमधून (एमएच 02 एएल 4379) गांजा विक्री आणि वाहतूक करत असल्याची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली.

सीसीबीचे पोलिस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून 88,700 रुपये किंमतीचा 3.500 किलो गांजा व एक मारुती एस्टीम कार आणि रोख 3,700 रुपये जप्त केले. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, हवालदार आय. एस. पाटील, एस. बी. पाटील, ए. एन. रामागुनट्टी, जगदीश हादीमणी, अमरनाथ दंडीन आणि सचिन शिंदे, एम. एस. पाटील, एस मुगळखोड यांनी कारवाईत भाग घेतला.

Narcotics Bust Belgaum
Belgaum Sword Seized | तरुणाकडून गांजा, तलवार जप्त

रुक्मिणीनगरमध्ये काहीजण हेरॉईन विक्री करत असल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली होती. त्यांनी छापा टाकला असता रेहान महमदगौस रोटीवाले (रा. आंबेडकरनगर, सदाशिवनगर), गणेशकुमार अनिल नागने (रा. ओजेवाडी, ता. पंढरपूर, महाराष्ट्र), सय्यदपनीश गुलाबअहमद अंगरशा (रा. सुभाषनगर, बेळगाव), आदित्य राजू पडळकर (रा. सांगली), मोहम्महुसेन ऊर्फ नूरअहमद इनामदार (रा. रुक्मिणीनगर, बेळगाव) हेरॉईन विकत असल्याचे आढळून आले.

Narcotics Bust Belgaum
Belgaum News | चार दिवसात 20 झाडे भुईसपाट

त्यांच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे 30 गॅ्रम हेरॉईन जप्त करण्यात आले. या सर्वावर मार्केट पोलिस ठाण्यात कलम 21 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news