Dombivli Monsoon Shopping: पावसाची चाहूल... अन् डोंबिवली बाजारपेठा फुलल्या! छत्र्या-रेनकोट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

पावसाळी साहित्याच्या दरात वाढ
Dombivli Monsoon Shopping
Dombivli Monsoon ShoppingPudhari
Published on
Updated on

संस्कृती शेलार

डोंबिवली शहर: कडक उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या डोंबिवलीकरांचे डोळे आता वरुणराजाच्या आगमनाकडे लागले आहेत. जूनचा दुसरा आठवडा उलटला आला तरी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसली, तरी त्याच्या आगमनाची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठा मात्र अक्षरशः बहरल्या आहेत.

"पाऊस कधीही कोसळू शकतो, मग ऐनवेळी धावपळ कशाला?" या विचाराने नागरिकांनी पावसाळी खरेदीसाठी बाजारपेठांकडे धाव घेतली असून छत्र्या, रेनकोट आणि ताडपत्रीच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी उसळली आहे.

Dombivli Monsoon Shopping
kharif sowing: पालघर जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा तयार

शनिवार-रविवारची सुट्टी साधत डोंबिवली पूर्वेतील फडके रोड, टिळक रोड, स्टेशन परिसर आणि मुख्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळाली. महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून नोकरदार वर्गापर्यंत सर्वच जण पावसाच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज होताना दिसले.

यंदा बाजारात आधुनिक आणि आकर्षक छत्र्यांची रेलचेल आहे. विशेषतः ‘फाइव्ह-फोल्ड’ छत्र्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. घडी केल्यानंतर अगदी छोट्या आकारात मावणाऱ्या या छत्र्या बॅग किंवा पर्समध्ये सहज ठेवता येतात. तसेच वाऱ्याच्या झोतांनाही तोंड देणाऱ्या ‘विंड-प्रूफ’ आणि उलट्या पद्धतीने बंद होणाऱ्या ‘इन्व्हर्टेड’ छत्र्यांनाही मोठी मागणी आहे.

चिमुकल्यांसाठी डोरेमॉन, स्पायडरमॅन, बार्बी यांसारख्या विविध कार्टून पात्रांच्या रंगीबेरंगी छत्र्या बाजारात आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. दुसरीकडे तरुणाईचा कल ट्रेंडी, स्टायलिश आणि हलक्या वजनाच्या छत्र्या व रेनकोटकडे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Dombivli Monsoon Shopping
Fraud News: पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; दोन आरोपींना अटक

छत्र्यांप्रमाणेच रेनकोटच्या विक्रीलाही वेग आला आहे. महिलांसाठी डिझायनर रेनकोट, पुरुषांसाठी बॅग कव्हरसह येणारे रेनकोट, तर महाविद्यालयीन तरुणाईसाठी प्रिंटेड रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत. प्रिंटेड रेनकोटच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाळी साहित्य किंमत

साधी छत्री : २५० ते १२००

रेनकोट : ६०० ते १५००

कार्टून छत्री : २०० ते ७००

यंदा बाजारात छत्री आणि रेनकोटचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पण त्यांच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत. ट्रेंडी आणि हलक्या वजनाचे पर्याय जास्त दिसत आहेत.

- अर्पिता पाटील, तरुणी.

लोकल आणि बसने प्रवास करताना पावसाचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचा रेनकोट आणि फोल्डेबल छत्री घेण्याकडे माझा कल असतो. यंदा बाजारात महिलांसाठी अनेक रेनकोटचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.

- स्वाती जोशी, नोकरदार महिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news