Dombivli Minor Girl Suicide | डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा

Dombivli Minor Girl Suicide | डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी लोकलच्या धडकेत झालेल्या अल्पवयीन तरुणीच्या मृत्यू प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
Dombivli Minor Girl Suicide | डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा
Pudhari
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी लोकलच्या धडकेत झालेल्या अल्पवयीन तरुणीच्या मृत्यू प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत असताना तपासात ही आत्महत्या असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. इतकेच नव्हे तर उत्तरीय तपासणी अहवालात तरुणी तीन महिन्याची गर्भवती असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

Dombivli Minor Girl Suicide | डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा
Dombivli Police | डोंबिवली पोलिसांकडून हरवलेले ३३ मोबाईल मूळ मालकांना परत

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी रेल्वे अपघात म्हणून लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांच्या जबाबानुसार आणि मोबाईलमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

तपासादरम्यान मृत तरुणीच्या मोबाईलमधील चॅटिंग आणि समाज माध्यमांवरील संभाषणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातून ती तरुणी राज पकड नावाच्या तरुणाच्या प्रेमात असल्याचे उघड झाले. दोघांची ओळख इंस्टाग्रामद्वारे झाली होती आणि नंतर दोघांमध्ये जवळीक वाढली होती.

Dombivli Minor Girl Suicide | डोंबिवलीत अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा
Stray dogs at crematorium : डोंबिवली कुंभारखानपाडा स्मशानभूमीवर भटक्या श्‍वानांचा कब्जा

पुढील तपासासाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरीय तपासणी अहवालात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. अहवालानुसार मृत तरुणी तीन महिन्यांची गर्भवती होती. या सर्व बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी राज पकड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने तरुणीशी असलेले प्रेमसंबंध आणि इतर माहिती मान्य केली. त्यानंतर पोलिसांनी राज पकड याच्यावर अटकेची कारवाई केली.

महत्त्वाचे मुद्दे

  • पोस्टमार्टममध्ये गर्भवती असल्याचे निष्पन्न : उत्तरीय तपासणी अहवालात मृत अल्पवयीन तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

  • प्रियकराला ठोकल्या बेड्या : इंस्टाग्रामद्वारे ओळख झालेल्या व प्रेमसंबंध असलेल्या राज पकड नावाच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news