Dombivli Midc Water Supply: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील पाणीप्रश्न सुटणार; 70 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या 2 टाक्या मंजूर

या कामासाठी 15 कोटी रूपयांच्या निधीलाही मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.
dombivli midc water supply
dombivli midc water supplyPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीकडून 20 लाख लिटर क्षमतेची ओव्हरहेड आणि 50 लाख लिटर क्षमतेची भूमिगत अशा दोन नव्या पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या आहेत. या कामासाठी 15 कोटी रूपयांच्या निधीलाही मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.

dombivli midc water supply
Illegal Liquor Crackdown: ठाणे जिल्ह्यात गावठी दारू निर्मितीवर मोठी कारवाई

डोंबिवली जिमखान्याजवळील एमआयडीसी परिसरात बांधण्यात आलेली ओव्हरहेड पाण्याची टाकी गेल्या 15 वर्षांपासून बंद होती. मुंबईच्या आयआयटीने ही टाकी धोकादायक असल्याचा निर्वाळा देऊन तातडीने पाडण्याची सूचना केली होती.

ही माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर समोर आली. या संदर्भात प्रफुल्ल देशमुख यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली.

dombivli midc water supply
Kalyan Encroachment Action: वालधुनीतील बुद्धभूमी कारवाईवरून वाद चिघळला; केडीएमसीच्या खुलाशाला फाऊंडेशनचा विरोध कायम

जुनी टाकी पाडून नवीन टाकी बांधण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआयडीसीच्या सीईओंशी चर्चा केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 20 लाख लिटर क्षमतेची ओव्हरहेड टाकी व एमआयडीसी कार्यालयाच्या परिसरात 50 लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यास मंजुरी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news