Road Issue: एमआयडीसी परिसरातील रस्ते आधी चकाकले, आता नाल्यांसाठी उखडले

डोंबिवली एमआयडीसी प्रशासनाच्या उफराट्या कारभारामुळे नागरिक त्रस्त
monsoon preparedness road digging controversy
monsoon preparedness road digging controversyPudhari
Published on
Updated on

डोंबिवली शहर: डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील काँक्रिट रस्ते तोडण्याची मालिका अद्याप सुरू असून, आता पावसाळा तोंडावर असतानाच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोडवरील चार बिल्डिंग आणि गौरीनंदन सोसायटीजवळील मुख्य रस्ता नाल्याच्या बांधकामासाठी खोदण्यात आला आहे. या कामामुळे संबंधित रस्ता किमान महिनाभर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

monsoon preparedness road digging controversy
Kalyan illegal construction case: सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या? विश्वनंदा सोसायटीतील बांधकामांवरून वाद

या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच काही अंतरावरील एका कंपनीसमोरील रस्त्याच्या कडेलाही तोडण्यात येत असल्याने परिसरातील वाहतुकीवर आणखी ताण निर्माण झाला आहे.

यापूर्वी अभिनव शाळेजवळील तसेच कावेरी चौक ते आजदे गावदरम्यानचा काँक्रिट रस्ता तोडण्यात आल्याने त्या भागातील वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. पुढील काळातही एमआयडीसीतील आणखी काही रस्त्यांवर अशीच कामे होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

“नाले आणि गटारे नव्याने बांधायची होती, तर काँक्रिट रस्ते तयार करण्यापूर्वी ही कामे का करण्यात आली नाहीत?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

monsoon preparedness road digging controversy
Bhiwandi Water Crisis: भिवंडीत ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा वेळेत सुरू झाल्यास आणि नाल्यांची कामे अपूर्ण राहिल्यास एमआयडीसी परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

...अन्यथा पूरपरिस्थितीची शक्यता

काँक्रीटचे रस्ते बांधण्यापूर्वी नाले आणि गटारे नव्याने बांधले का नाहीत? जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी नाही का? आदी सवाल रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. परंतु या प्रश्नांची उत्तरे लोकप्रतिनिधी वा प्रशासनाकडे नसल्याने स्थानिक रहिवासी हतबल झाले आहेत. जर पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात वेळेवर सुरू झाला तर मात्र या नाल्यांची कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने मोठी पंचाईत होणार आहे. एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या भागातील जागरूक रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news