Bridge Stunt Video Viral: दुचाकीवर उभा राहून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; डोंबिवलीच्या मोठागाव-माणकोली पुलावरील व्हीडिओ व्हायरल

अशा स्टंटबाजांवर कारवाई का केली जात नाही ? असा सवाल या पुलावरून ये-जा करणाऱ्या संतप्त वाहनचालक आणि प्रवाशांसह पादचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
Bridge Stunt Video Viral
Bridge Stunt Video ViralPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: डोंबिवलीच्या मोठागाव-माणकोली पुलावरील स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा जीवघेण्या पद्धतीने दुचाकीवर उभा राहून एक तरूण स्टंटबाजी करत असल्याचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर अशा स्टंटबाजांवर कारवाई का केली जात नाही ? असा सवाल या पुलावरून ये-जा करणाऱ्या संतप्त वाहनचालक आणि प्रवाशांसह पादचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

Bridge Stunt Video Viral
RTE Admisson: आरटीईअंतर्गत पालघर जिल्ह्यात 66 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण

डोंबिवली-भिवंडीला जोडणाऱ्या मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाण पुलावर रात्रीच्या सुमारास जीवघेणे स्टंट अजूनही सुरूच आहेत. कार आणि दुचाक्यांवर चालणाऱ्या अशा स्टंटबाजांमुळे स्वतःसह पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका वाढला आहे. अशा स्टंटबाजांच्या जीवघेण्या रेसकोर्सला रोखणार कोण ? असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी या स्टंटबाज तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Bridge Stunt Video Viral
water supply issue: वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागात नियोजनाचा दुष्काळ; कोट्यवधींच्या खर्चवाढीमुळे करदात्यांना फटका

अशा स्टंटबाजांच्या जीवघेण्या रेसकोर्सला रोखणार कोण ? असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी या स्टंटबाज तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news