Dombivli Gymkhana Election: डोंबिवली जिमखाना निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप...

मनसे नेते राजू पाटील यांच्या पोस्टने चर्चेला उधाण...
Dombivli Gymkhana
Dombivli Gymkhana
Published on
Updated on

नेवाळी : डोंबिवली मधील जिमखाना हा प्रसिद्ध असून येत्या १६ तारखेला कार्यकारिणीच्या निवडणूका होत आहेत. दरम्यान या निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप होत गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणूकीत राजकीय वातावरण तापू शकते असे आता बोलले जात आहे.

जिमखाना निवडणूकीवरून मनसे नेते राजू पाटील यांनी केलेली समाज माध्यमावरील पोस्ट आता चर्चेत आली आहे. आपल्या पोस्ट राजू पाटील म्हणाले की डोंबिवली शहरातील एक प्रतिष्ठित जिमखाना म्हणजेच ‘डोंबिवली जिमखाना’. येत्या १६ तारखेला जिमखान्याच्या कार्यकारिणीच्या निवडणूका होत आहेत. मी सुद्धा या जिमखान्याचा आजीवन सदस्य आहे.पण आतापर्यंत कधीच अश्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला नव्हता.

Dombivli Gymkhana
Wilson Gymkhana Protest: विल्सन जिमखाना आमच्या हक्काचा! जिओ संस्थेला हस्तांतरणाविरोधात आझाद मैदानात तीव्र मोर्चा

यापूर्वी निवडून आलेले सदस्य कोणत्या ना कोणत्या पक्षाचे समर्थक जरी असले तरी जिमखान्याच्या कामकाजावर त्याचा परिणाम होताना कधी दिसला नाही.परंतु या निवडणुकीत मला स्पष्ट राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे.डोंबिवलीतील ‘सावरकर उद्यान’ व ‘नेहरू मैदान’ या मैदानांचे लचके तोडणारी मंडळी यावेळी निवडणूक लढवताना दिसत आहे. माझी सर्व सन्माननीय जिमखाना सदस्यांना विनंती आहे की आपला जिमखाना अश्या लोकांच्या हातात देऊ नका जे भविष्यात या जिमखान्याचे राजकीय मैदान करतील.

Dombivli Gymkhana
Girgaon Chowpatty gymkhana : विल्सन जिमखान्यावर ‌‘आम्ही गिरगावकर‌’चा दावा

जिमखान्याची अराजकीय व स्वायत्त ओळख पुसता कामा नये,म्हणून जिमखाना कोणा एका राजकीय पक्षाचे मैदान होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी सर्व सुज्ञ सन्माननीय सदस्यांची आहे.नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा यावेळी विचार करून मतदान करा, असे पाटील यानी सांगितले.दरम्यान यावरून राजकीय तापू शकते असे आता बोलले जात असून लचके तोडणारी मंडळी नक्की कोण असा आता उपस्थित केलाय जातोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news