Dombivli Crime | डोंबिवलीत चाकूने दरवाजा फोडत जीवे मारण्याची धमकी : शेजाऱ्याकडून दोघींचा विनयभंग

मानपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
molestation case
molestation casePudhari
Published on: 
Updated on: 

Molestation Case Dombivli

डोंबिवली : डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या खोणीगाव म्हाडा वसाहतीत एका मद्यधुंद शेजाऱ्याने दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लहान मुलीच्या वाढदिवसाच्या आनंदावर विरजण टाकत मद्यपीने कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण, महिलांचा विनयभंग तर केलाच शिवाय चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण इमारतीत भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या वाशी येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स असून त्या कुटुंबासह खोणी गावातील म्हाडा वसाहतीत राहतात. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात लहान मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य घराबाहेर फोनवर बोलत उभा असताना समोरच्या रूममध्ये राहणारा सतिश रामचंद्र सातपुते (४२) हा अचानक मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. कुटुंबातील सदस्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता सतिश याने त्याच्यावर थेट हल्ला करत ठोसा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

molestation case
Dombivli Crime : केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचा बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

त्यानंतर फिर्यादी महिला मध्यस्थी करण्यासाठी दरवाजात आल्या असता हल्लेखोर सतिश याने त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अंगावर धावून येत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोर सतिश जबरदस्तीने घरात घुसला आणि त्याच इमारतीत राहणाऱ्या आणखी एका २६ वर्षीय महिलेचा विनयभंग केला.

आरडाओरड झाल्याने कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी कसेबसे हल्लेखोराला घराबाहेर काढले. मात्र यानंतर सतिश आणखीच चवताळला. त्याने थेट स्वतःच्या घरात जाऊन धारदार चाकू आणला आणि फिर्यादीच्या घरासमोर उभा राहून तुम्हा सर्वांना बघून घेतो...एकेकाला खतम करतो... अशा धमक्या देत चाकूने दरवाजावर वार करून दरवाजाचे नुकसान केले. यावेळी त्याला साथ देण्यासाठी त्याचा भाऊ सागर सातपुते आणि एक अनोळखी व्यक्ती आली. त्यांनीही पुन्हा शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.

molestation case
Dombivli Crime: प्रेमसंबंध तोडल्याचा राग; डोंबिवलीत विवाहितेला 70 व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

या घटनेमुळे म्हाडा वसाहतीतील महिला आणि रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सतिश सातपुते याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नगनाथ बन्सोडे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news