डोंबिवली स्फोट प्रकरण : आरोपी मलय मेहतासह पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

डोंबिवली स्फोट प्रकरण : आरोपी मलय मेहतासह पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमधील अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि या कंपनीचे मालक मलय प्रदीप मेहता आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांनी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मलय मेहता यांच्या त्यांच्या पत्नीचाही या स्फोट प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आल्याने क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिटने त्यांनाही मंगळवारी अटक केली. बुधवारी मलय मेहता यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाचा तपास स्थानिक मानपाडा पोलिसांकडून काढून क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिटकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक करत आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना आरोपींच्या चौकशीची गरज असल्याने त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकार पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली.

यावेळी आरोपींतर्फे ॲड. सम्राट ठक्कर यांनी न्यायालयात बाजू मांडली. कंपनीतील स्फोट तांत्रिक कारणामुळे नाही तर वाढत्या उष्णतामानामुळे झाल्याचा दावा केला आहे. हा मानवी अपघात नाही तर एक घडून गेलेली दुर्घटना आहे. ही घटना नैसर्गिक असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. मुख्य आरोपी मलय मेहता यांची सात दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपली होती. त्यांना पत्नीसह बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

अमुदान कंपनी स्फोटात तीन मृतदेहांची ओळख पटली आहे. तर, नऊ मृतदेहांची ओळख पटविणे बाकी आहे. त्यासाठी बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक तथा दावेदारांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत मृतदेहांचे 28 अवशेष हाती लागले असून रक्तांच्या नमुन्यांसह हे अवशेष देखील कालिन्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news