Dombivli theft : शिक्षकाच्या घरावर डल्ला

९ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : डोंबिवलीत घरफोडी चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या शिक्षकाच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी खिडकीची लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करत तब्बल ८ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. भरगच्च लोकवस्ती असलेल्या आणि नेहमी गजबजलेल्या आयरे रोड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे.

या संदर्भात पोलिस दप्तरी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आयरे रोडला पाटकर शाळेजवळ असलेल्या शरयू सोसायटीत राहणारे योगेश रमेश घारे (३७) हे व्यवसायाने शिक्षक आहेत. योगेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४० ते रात्री १०.३० या कालावधीत मुलाचा वाढदिवस असल्याने ते कुटुंबासह फडके रोडला एका हॉटेलमध्ये स्नेहभोजन करण्यासाठी गेले होते.

Crime News
Thane crime: भाईंदरमधील सुरभी पॅलेस लॉजिंग बोर्डिंगवर छापा

घराला कुलूप लावून ते गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बेडरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील कोणत्यातरी हत्याराने तोडली आणि त्या वाटेने घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील चार कपाटे उघडून त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. जेवण करून घारे कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.

योगेश घारे यांनी तात्काळ रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. एकीकडे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल सोळंके आणि त्यांचे सहकारी करत आहेत. तर दुसरीकडे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटनेही समांतर तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Crime News
Palghar storm damage : वादळीवाऱ्याचे वाडा तालुक्यात थैमान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news