Palghar storm damage : वादळीवाऱ्याचे वाडा तालुक्यात थैमान

चिखल, खरिवली गावात घरांचे अतोनात नुकसान
Palghar storm damage
Palghar storm damagepudhari photo
Published on: 
Updated on: 

वाडा : वाडा तालुक्यात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेकडो घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठमोठी झाडे वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली असून महावितरणचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वाऱ्याचा वेग इतका होता की त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील चिखले, सावरखांड, अबिटघर या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ६० ते ७० टक्के घरांचे नुकसान झाल्याचे स्थानिक सांगतात.

Palghar storm damage
Thane Zilla Parishad pension : आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन

मांडा, भोपीवली, खरीवली, पिंपळास, हमरापुर या भागात देखील वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे ५० ते ६० टक्के घरांचे नुकसान झाले असे स्थानिक सांगतात. खरीवली ते मांडा व पिंपळास या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सर्वात मोठे नुकसान महावितरणचे झाले असून जवळपास चार ते पाच फिडरचे मोठे नुकसान झाल्याचे विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितले.

घरांवर झाडे कोसळून पत्रे, भिंती व आतील साहित्याचे अतोनात नुकसान झाले असून सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. आ. दौलत दरोडा यांनीही वाडा तहसीलदारांना पत्र लिहून तशी मागणी केली असून पंचनामे करण्याच्या सूचना केल्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले.

Palghar storm damage
Voter Registration: १८ वर्षे पूर्ण झालीत? मतदार यादीत नाव नसेल तर लगेच करा नोंदणी; पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोहीम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news