Dombivli Crime : डोंबिवलीत डेटिंगच्या नावाखाली चार तोळे सोने लंपास

विष्णूनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Dombivli Crime
Dombivli online acquaintance theftpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवली येथे एका ॲपच्या माध्यमातून ओळख निर्माण करून भेटीसाठी घरी गेल्यानंतर दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून गजाआड केले आहे. तपासादरम्यान अशाच स्वरूपाची आणखी एक घटना समोर आल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Dombivli Crime
Vasai Virar cancer screening facility : वसई-विरार मनपा रुग्णालयात होणार कर्करोगतपासणी

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने एका प्रसिद्ध ॲपच्या माध्यमातून एका तरुणाशी संपर्क साधला होता. त्यानंतर संबंधित तरुणाला त्याने आपल्या घरी बोलावले. त्या दोघांची भेट झाल्यानंतर तो तरुण तेथून निघून गेला. मात्र तो गेल्यानंतर घरातील दागिने तपासले असता सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले.

हा प्रकार लक्षात येताच त्याला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीबद्दल पोलिसात तक्रार करावी की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर फिर्यादीवरून फरार आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्‍यात आला.

Dombivli Crime
Palghar industrial traffic : अवजड ट्रेलरच्या पार्किंगमुळे बोईसर-चिल्हार मार्गावर अपघातांचा धोका

अनेकांना लक्ष्य केल्याचा संशय

उपलब्ध माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन प्रवीण याला अटक केली. अटकेनंतर त्याची न्यायालयीन प्रक्रियेनुसार आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अशाच पद्धतीची आणखी एक घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत अशा स्वरूपाच्या दोन घटना समोर आल्या असून या दोन्ही घटनांमध्ये एकाच प्रकारची पद्धत वापरण्यात आली आहे का? आरोपीने आणखी किती जणांना अशाच पद्धतीने लक्ष्य केले आहे? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news