

ठाणे : राज्यात महायुतीमध्ये असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेने महापालिका निवडणुकीची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. गुरुवारी भाजपकडून इच्छुकांची एक बैठक झाली. या बैठकीमध्येही भाजपकडून पुन्हा स्वबळाचा तसेच 70 पारचा नारा देण्यात आला. आमच्या प्रभागात काही मंडळींकडून कुरघोड्या करण्याची कामे सुरू असून यापूर्वीही आम्ही ठाण्यात सत्ता आणत आहोत. त्यामुळे यावेळीही स्वबळावर सत्ता आणण्याची आमची तयारी असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर आणि भाजप ठाणे अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.
आमदार संजय केळकर म्हणाले, ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात, त्या त्या वेळेला भारतीय जनता पार्टी कार्यशाळा घेतात. आमचे जे कार्यकर्ते आहेत ते परिचय पत्र आज भरून देत होते. जोर बैठका या चालूच राहतात. गेल्या वीस वर्षांमध्ये अनेक वेळा युती झालेली नाही एका बाजूलाची तयारी आहे, असे म्हटले जाते आणि दुसऱ्या बाजूला जागावाटप करतात. 365 दिवस आमचे सैन्य हे तयारीत असते, असे आमदार केळकर यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये जास्त आमदार भाजपचेच आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ येते त्या त्या ठिकाणी जायलाच पाहिजे कोणाची जहागिरी नसते त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलावल्यावर जावं लागते, असे प्रतित्युर त्यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहे. पूर्वीही युती झाली नाही. मात्र गफिक राहता कामा नये भाजपचा महापौर होण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या इच्छेला अनुसरून काम करेल, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला.
प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी
दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे. महायुती म्हणून विधानसभा लढलो, लोकसभा लढलो. ठाणे महापालिका म्हणून लढावे अशी आमची इच्छा आहे. पण समोरच्याची इच्छा नसेल. गेले दहा वर्ष आणि त्याच्याही आधीपासून महापालिकामध्ये एक हाती सत्ता आणतोय. राज्यातील महायुतीचे नेते जो निर्णय घेतील त्याचे पालन करणे हे आम्ही आमचे काम समजतो. वर्षींवर्ष काही नगरसेवक त्या-त्या बोर्डामध्ये निवडून येत आहेत. युती असली तरी लोकल लेव्हलला प्रत्येक जण आपला पक्ष सांभाळायचा प्रयत्न करत असतो. कुरघोडी आहेत त्या मांडल्या त्यांना आम्ही समजवण्याचे काम करू.
भाजपला हवाय ठाण्याचा महापौर
ठाण्यात भाजपाचा महापौर बसवायचा आहे, त्यासाठी 70 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार आज झालेल्या भाजपच्या कार्यशाळेत भाजपाच्या बूथ प्रमुखापासून शहर पदाधिकाऱ्यांपर्यंत कार्यकर्त्यांनी केला. त्यादृष्टीने भाजपच्या इच्छुकांनी आपले परिचय पत्रेही पक्ष नेतृत्वाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्याअनुषंगाने निवडणूक आयोग आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुका कशा लढवायच्या याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडीसोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली.