Thane Crime : दिव्यात नायजेरियन निघाले अमली पदार्थांचे तस्कर

नायजेरियन दाम्पत्याच्या घरातून १०.६३ कोटींचे अमली पदार्थ जप्त
Diva Drug Seizure
Diva Drug Seizurepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत मुंब्र्यातून तीन टांझानियन आणि एका नायजेरियन नागरिकाला सुमारे दीड कोटी रुपयांच्या एमडीसह अटक करण्यात आली होती. सदरची घटना ताजी असतानाच मुंब्रा अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दिवा पूर्वेकडील बेतवडे गावातील मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड सोसायटीमधील नायजेरियन दाम्पत्याच्या घरातून तब्बल १० कोटी ६३ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

पोलीस पथकाने सदरची कारवाई १३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी केली. यात नायजेरियन दाम्पत्याच्या घरातून दोन किलो ९८.५ ग्रॅम कोकेन आणि १०४.७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात नायजेरियन नागरिक चुकवुएमेका इमॅन्युएल न्वाक्वो (४१) आणि त्याची पत्नी युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजु (४१) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Diva Drug Seizure
Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यावरून वाद

मुंब्रा पोलिस ठाण्याचे अंमलदार नवनाथ थोरवे यांना बेतवडे येथील सोसायटीत परदेशी नागरिक अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. सोसायटीच्या औरा इमारतीतील ३६ व्या मजल्यावरील ३६०२ क्रमांकाच्या सदनिकेत हे दाम्पत्य राहत असल्याचे आढळले.

पोलिसांनी पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत घराची झडती घेतली. त्यावेळी फ्रिजवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यात पांढऱ्या रंगाची पावडर असलेल्या वेगवेगळ्या पिशव्या आढळल्या. तपासणीत त्यामध्ये एमडी आणि कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. अमली पदार्थांसह रिकामे प्लास्टिक पाऊच आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटाही जप्त करण्यात आला. तसेच दाम्पत्याचे दोन मोबाईल, पासपोर्ट आणि ७ हजार ६०० रुपयांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली.

Diva Drug Seizure
New Gas Connections : नवीन गॅस कनेक्शन बंद असल्याने ग्रामीण ग्राहकांच्या अडचणीत वाढ !

जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० कोटी ६३ लाखांहून अधिक आहे. दिवा परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा आढळण्याची सर्वाधिक मोठी घटना मानली जात आहे. या तस्करीमागील पुरवठादार, स्थानिक वितरक आणि ग्राहकांचे जाळे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दिव्यातील दाम्पत्याचे अन्य तस्करांशी काही संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.