Thane Fire : दिव्यात पेटल्या तीन कार

आगीत एक कार जळून खाक
Diva Car Fire
Diva Car Firepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : दिव्यात तीन कारला आग लागल्याची घटना घडली असून या आगीत एक कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दिवा-आगासन रोडवरील शाळे -समोर ही घटना घडली. उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांना शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

या आगीत दोन कारचे मोठे नुकसान झाले असून, त्यापैकी एक कार पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. शनिवारी सकाळी ६.३७ वाजण्याच्या सुमारास या आगीची माहिती शीळ अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. मुंब्रा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

Diva Car Fire
MHADA Mill Workers Housing : कोन, पनवेलमधील घरांच्या ताब्यासाठी १,०५१ विजेते

या आगीमध्ये ह्युंदाई औरा ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. तर मारुती सुझुकी वॅगन आर या कारचे किरकोळ नुकसान झाले. याशिवाय एका अज्ञात कारचेही आगीत पूर्णपणे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझविली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. तर, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

Diva Car Fire
Marathi Diwali Ank History : मराठी दिवाळी अंक संस्कृती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.