Varun Sardesai: दिशा सालियान प्रकरणी आरोप करणाऱ्यांनी एक तरी पुरावा द्यावा; वरुण सरदेसाईंचे आव्हान

Varun Sardesai on Disha Salian Case| कल्याणमधील आढावा बैठकीत सरदेसाईंची भूमिका; नरेंद्र पवार प्रकरण आणि केडीएमसीच्या राजकीय परिस्थितीवरही सत्ताधाऱ्यांवर टीका
Disha Salian Case
Disha Salian CasePudhari
Published on
Updated on

कल्याण: दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी एक तरी पुरावा द्यावा असे आव्हान उद्धव सेनेचे युवा नेते आमदार वरून सरदेसाई यांनी केले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजिन करण्यात आले होते.

पक्षाच्या आढावा बैठकीला युवा सेनेचे नेते आमदार वरुण सरदेसाई प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्याच्या सह,केडीएमसीतील ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार वरून सरदेसाई यांनी सांगितले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Disha Salian Case
Lalbaugcha Raja Darshan Fraud: लालबागच्या राजाच्या थेट दर्शनाचे आमिष महागात पडले! चार भाविकांची फसवणूक; बारावीतील विद्यार्थी अटकेत

विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याविरोधात छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आक्रमक होतात आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होते. मात्र, बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल असतानाही संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जाते .

“नरेंद्र पवार भाजपचे आहेत म्हणून त्यांना कोणतेही संरक्षण मिळता कामा नये. त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. कायद्यानुसार त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेत त्यांनी महापालिकेत अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्ती बाबतही ठोस निर्णय झालेला नसल्याचे सांगितले.तसेच

Disha Salian Case
Devendra Fadnavis on UPI Charges: UPI शुल्कावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका; व्यापारी-पेट्रोल पंपधारकांना म्हणाले, ‘विरोध करू नका’

शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. “दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू आहे; मग जनतेची कामे कधी होणार ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news