DCM Eknath Shinde | राज्यातील 184 पर्यटक मुंबईत सुखरूप परतणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून पर्यटकांना दिला निरोप
Pudhari News
राज्यातील पर्यटकांना घेऊन निघालेले विमान जम्मू आणि काश्मीरमधून मुंबईकडे रवाना Pudhari News Network
Published on
Updated on

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान गुरुवार (दि.24) रोजी पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर शुक्रवार (दि.25) दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले होते.

Pudhari News
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल

या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्याना आशवस्त करून मुंबईकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली.

तसेच तत्पूर्वी शिंदे यांनी या पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांचा ताण हलका करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत खास फोटोसेशनही केले. राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले हे विमान शुक्रवार (दि.25) संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 येथे पोहोचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news