

ठाणे : राज्य शासनाने मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसाठी दहीहंडीऐवजी नारळी पौर्णिमेला, अनंत चर्तुदशीऐवजी गौरी विसर्जनला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. दहीहंडीची सार्वजनिक सु्ट्टी रद्द केल्याने गोविंदा पथकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने बहिणांना खूश करण्यासाठी रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर केल्याने बहिणी खूष झाल्या असल्यातरी गोविंदा सरकारवर नाराज झाले आहेत.
मुंबई महानगर प्रदेशांमध्ये दहीहंडी उत्सवाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाने काही वर्षांपासून दहीहंडीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती, मात्र यंदा 16 ऑगस्ट रोजी साजर्या होणार्या दहीहंडीची सार्वजनिक सुट्टी रद्द करून शासनाने ही सुट्टी नारळी पौर्णिमेला जाहीर केली आहे. तसेच अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबरची सुट्टी 2 सप्टेंबरला गौरी विसर्जनासाठी देण्यात आली आहे.
दहीहंडीसाठी शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द केल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे. ही केवळ एक सुट्टी नसून, आमच्यासाठी ती श्रद्धेचा आणि एकात्मतेचा सन्मान आहे. गोविंदा पथकातील अनेक युवक कामगार, विद्यार्थी व नोकरदार वर्गातील असून, सुट्टी न मिळाल्यास त्यांना या सणात सहभागी होता येणार नाही. या निर्णयाचा मानवी आणि सांस्कृतिक बाजूने पुनर्विचार करून, या दिवशीची सार्वजनिक सुट्टी पुन्हा जाहीर करावी
समीर पेंढारे, उपाध्यक्ष, दहीहंडी असोसिएशन