Thane Dahi Handi 10 Thar: ठाण्यात 'कोकण नगरचा राजा'चा विश्वविक्रम, दहीहंडीत 10 थर रचले

Dahi handi 20205: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 25 लाखांचे पारितोषिक केले जाहीर
Dahihandi Thane World Record
Dahihandi Thane World Recordpudhari
Published on
Updated on

Dahi handi 2025 Thane Govinda Pathak World Record 10 Thar

ठाणे : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यांना 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

9 थरांपासून 10 थरांपर्यंतचा थरारक प्रवास

यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडवला होता. गोकुळाष्टमीच्या या अभूतपूर्व विक्रमापेक्षा एक थर उंच जात कोकण नगर पथकाने नवा इतिहास घडवला आहे.

Dahihandi Thane World Record
Sanskruti Yuva Pratishthan Dahi Handi : संस्कृतीच्या दहीहंडीत दहा थराला २५ लाखांचे पारितोषिक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

"गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. 10 थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब यांची परंपरा आम्ही पुढे नेली आहे. आजचा हा क्षण तर अत्यंत गौरवाचा अभिमानाचा आहे"

Dahihandi Thane World Record
Gokul Dahi Handi : शारदा संकल्प प्रतिष्ठानची गोकुळ दहीहंडी रंगणार

संस्कृती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले,

"यापूर्वी आमच्या मंचावर 9 थरांचा विक्रम झाला होता. आज 10 थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान आहे. कोकण नगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. मला विश्वास होता की, कोकणनगर विश्वविक्रम रचेल, माझा हा विश्वास सार्थ ठरला."

ठाणे
संस्कृती प्रतिष्ठान, वर्तकनगर ठाणे येथे 10 थर रचत कोकण नगर जोगेश्वरीने यंदाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ( छाया : अनिशा शिंदे)

10 थरांचा विक्रम

10 थरांचा विक्रम मुंबईतील जय जवान गोविंदा पथक मोडणार अशी आशा होती. पण त्यापूर्वीच मुंबईच्याच कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने हे विश्वविक्रम केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news