Sanskruti Yuva Pratishthan Dahi Handi : संस्कृतीच्या दहीहंडीत दहा थराला २५ लाखांचे पारितोषिक

स्पॅनिश खेळाडू देणार स्वातंत्र्यदिनास मनोऱ्यांची सलामी; शोले चित्रपटाचे सुवर्ण वर्षे साजरा करणार
Dahi Handi |
संस्कृतीच्या दहीहंडीत दहा थराला २५ लाखांचे पारितोषिकFile Photo
Published on
Updated on

ठाणे : जागतिक विक्रम घडणाऱ्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस असून दहा थर लावणाऱ्या पथकास २५ लाखांचे बक्षीस आहे. त्याचबरोबर स्पॅनिशचे १११ गोविंदा हे मानवी मनोरा रचणार आहेत. यंदा दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची असून जय आणि विरुची जोडी दिसणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

संस्कृतीच्या दहीहंडीकडे सर्व गोविंदा पथकाचे लक्ष लागलेले असते. १६ ऑगस्टरोजी सकाळी १० ते रात्रौ १० पर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्र. ४४ च्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे. या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहे. बॉलिवूडच्या शोले चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली, या निमित संस्कृती दहीहंडी उत्सव 'शोले' चित्रपटाचा 'सुवर्ण महोत्सव' साजरा करणार आहे.

दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तक नगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले ९ थर रचल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात ९ थर लावणाऱ्या पथकास ५ लाख व आकर्षक ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार आहे.

दीड लाख गोविंदांचा मोफत विमा

यंदा प्रो गोविंदा सीझन ३ देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहचला आणि अपघाताचे सत्र थांबले जावे हा प्रो गोविंदामागील उद्देश आहे. शासनाने आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे. मला अभिमान आहे आपल्या दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गोविंदांच्या काळजी पोटी दीड लाख गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे. यंदाचा गोविंदा अपघात मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन आ. प्रताप सरनाईक यांनी केले.

मनोरे रचून स्वातंत्र्यदिनास सलामी देणार

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले, १११ स्पॅनिश खेळाडू या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत आणि ह्युमन पिरॅमिड सादर करतील. हे खेळाडू १५ ऑगस्टला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मनोरे रचून स्वातत्र्यदिनास सलामी देणार आहेत. आपल्या संस्कृतीचे आदान प्रदान होईल. यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्व विक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे प्रतिनिधी टोनी, ऍना तसेच महाराष्ट्र गोविंदा असोसिएशनचे बाळा पडेलकर, गीता झगडे, अभिषेक सुर्वे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news