Johnny Lever meets D Mahesh: ही दोस्ती तुटायची नाय; आजारी मित्राची विचारपूस करण्यासाठी जॉनी लिव्हर पोहोचले ठाण्यात

Bollywood Comedian Johnny Lever News: आजारी मित्राची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन जॉनी लिव्हरने दिला सामाजिक संदेश
Johnny Lever meets D Mahesh
हि दोस्ती तुटायची नाय ! मैत्री असावी तर अशी !pudhari photo
Published on
Updated on

Bollywood Comedian Johnny Lever Reaches Thane Hospital To Meet Friend

वागळे : आपल्या हास्याने सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे डी महेश ट्रिपल वेसल डीसीज या आजाराने त्रस्त असल्यामुळे उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे येथे दाखल झाले होते. बॉलीवुडचे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते हस्यसम्राट जॉनी लिव्हर यांनी दि.15 जुलै 2025 रोजी सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे येऊन डी महेश यांची विचारपूस करून डॉक्टरांचे देखील आभार मानले.

Johnny Lever meets D Mahesh
Mumabi Thane Metro: ठाण्याहून थेट दक्षिण मुंबई गाठता येणार, 13 स्थानके- 17.51 किमी लांबीचा मार्ग, असा आहे मेट्रोचा प्रस्ताव

डी महेश यांच्यावर केलेली शस्त्रक्रिया ही फार गुंतागुंतीची होती. परंतु डॉक्टर अमोल गीते यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सर्व डॉक्टरांच्या सहायाने सदरची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. तसेच पाच लाख रुपये खर्चाची सदरची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून विनामूल्य केली. त्यांची ही बायपास सर्जरी यशस्वी झाली. त्यामुळे जॉनी लिव्हर यांनी डॉक्टर अमोल गीते यांच्या सर्व टीमचे आभार मानले.

Johnny Lever meets D Mahesh
Thane crime : रिक्षाचालकाने उचलला प्रवाशी तरुणीवर हात

यावेळी महेश यांची चौकशी करताना तू अगदी ठणठणीत दिसत आहेस असे कौतुकास्पद उद्गार देखील जॉनी लिव्हर यांनी काढले. प्रत्यक्ष भेटायला आलेले पाहून महेश देखील गहिवरले आणि त्यांनी जॉनी लिव्हर यांना मिठी देखील मारली. सदरची शस्त्रक्रिया अत्यंत जटील होती. सुर्दैवाने ती यशस्वी पार पडली. ही शस्त्रक्रिया करताना महेश वाचतील की नाही असा प्रश्न समोर होता. परंतु आम्ही आमच्या प्रयत्नाने ती सर्जरी यशस्वी केली. महेश यांना शस्त्रक्रियेच्या सहावा दिवशी डिस्चार्ज देण्यात आले असे डॉक्टर गीते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news